Mahindra XUV400 : देशात इलेक्ट्रिक वाहनांची (electric vehicles) मागणी वाढत आहे. अशातच महिंद्रा कंपनी पुढील महिन्यात XUV300 SUV चे इलेक्ट्रिक व्हर्जन आणणार आहे. ऑटोकार इंडियाच्या रिपोर्टनुसार, याला XUV400 असे नाव देण्यात आले आहे, जे 6 सप्टेंबर रोजी लॉन्च (Launch) होईल.
Mahindra XUV400 XUV300 पेक्षा लांब असेल
गेल्या महिन्यात या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे काही फोटो लीक झाले होते. त्याची रचना 2020 ऑटो एक्स्पोमध्ये दाखवलेल्या eXUV300 संकल्पनेसारखी आहे. मात्र, ही इलेक्ट्रिक कार पेट्रोल-डिझेल XUV300 पेक्षा थोडी लांब (सुमारे 4.2 मीटर) असेल.
कारण इलेक्ट्रिक वाहनांना उप-4 मीटर कर नियम लागू होत नाही. लांबीव्यतिरिक्त, डीआरएलसह नवीन हेडलाइट्स, टेल-लॅम्पसाठी नवीन डिझाइन आणि रीप्रोफाइल केलेले टेलगेट हे घटक इंधन XUV300 पेक्षा वेगळे करतात.
ADAS वैशिष्ट्य (Features) आढळू शकते
या इलेक्ट्रिक कारच्या मोटर किंवा बॅटरीबद्दल सध्या फारशी माहिती नाही. कंपनी याला सिंगल फ्रंट-व्हील-ड्राइव्ह इलेक्ट्रिक मोटरसह आणू शकते, जे सुमारे 150hp पॉवर जनरेट करू शकते.
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाण्याची अपेक्षा आहे. याशिवाय, कंपनी XUV400 ला ADAS वैशिष्ट्यांसह सुसज्ज करू शकते. त्याची थेट स्पर्धा Tata Nexon EV शी होऊ शकते, जी सध्या देशात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे.