Mahindra CNG Tractor:- ट्रॅक्टर आणि शेती यांचा घनिष्ठ संबंध असून ट्रॅक्टर शिवाय आता शेती शक्यच नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. शेती क्षेत्राशी निगडित असलेले अनेक यंत्रे विकसित करण्यात आलेले आहेत व यातील बहुसंख्य यंत्रे ही ट्रॅक्टरचलित असल्यामुळे ट्रॅक्टर ही शेतकऱ्यांची यंत्रांच्या दृष्टिकोनातून प्राथमिक गरज आहे.
अगदी कुठलेही पिक लागवड अगोदरची पूर्व मशागत तसेच पिकांची लागवडीपासून तर आंतरमशागत, पिकांच्या काढणीपर्यंतच्या विविध कामांमध्ये ट्रॅक्टरचा वापर केला जातो.
त्यामुळे शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर खरेदी करतात. बाजारामध्ये देखील अनेक प्रसिद्ध अशा ट्रॅक्टर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे ट्रॅक्टर असून बहुसंख्य ट्रॅक्टर हे डिझेलचलीत आहेत.
परंतु डिझेलच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर वापरणे शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे आता काही ट्रॅक्टर उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर देखील लॉन्च केले आहेत व त्यासोबतच महिंद्रा अँड महिंद्रा या प्रसिद्ध ट्रॅक्टर उत्पादक कंपनीने मात्र सीएनजी वर चालणारा ट्रॅक्टर लॉन्च करणार आहे.
महिंद्रा कंपनीचे अनेक ट्रॅक्टर मॉडेल सध्या बाजारपेठेत आहेत परंतु आता कंपनीने त्याही पुढे पाऊल टाकत सीएनजी ट्रॅक्टर लॉन्च केल्यामुळे इंधनावर जो काही खर्च व्हायचा तो आता कमी होणार आहे.
महिंद्राचे सीएनजी ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी ठरेल फायद्याचे
आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने सीएनजी ट्रॅक्टर बाजारात लॉन्च केला असून हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे. कुठल्याही शेतीकामामध्ये डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत या सीएनजी ट्रॅक्टरला खर्च कमी लागणार आहे.
कंपनीने या सीएनजी ट्रॅक्टर मध्ये 45 लिटर क्षमतेच्या चार टाक्या किंवा 200 बारच्या दाबावर 24 किलो गॅस भरून ठेवण्याची क्षमता दिली आहे.
विशेष म्हणजे डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत तासाला शंभर रुपयांची अंदाजे बचत सीएनजी ट्रॅक्टर मुळे होऊ शकते. त्यामुळे नक्कीच शेतकऱ्यांचा जो काही होणारा खर्च आहे तो कमी होण्यास मोठा हातभार लागणार आहे. तसेच प्रदूषणाच्या दृष्टिकोनातून देखील सीएनजी ट्रॅक्टर खूप फायद्याचे ठरणार आहे व यामुळे प्रदूषण कमी करण्यास मदत होईल.
डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये सीएनजी ट्रॅक्टर 70% उत्सर्जन कमी करेल व यामध्ये इंजिन कंपन खूपच कमी असल्यामुळे आवाजाची पातळी कमी राहण्यामध्ये देखील हे ट्रॅक्टर महत्त्वाचे आहे व ध्वनि प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होणार आहे. सीएनजी तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे ट्रॅक्टर डिझेल ट्रॅक्टरप्रमाणे शेतीची अनेक अवघड कामे आणि वाहतुकीची कामे देखील सहजपणे करू शकतो.
कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये उत्कृष्ट उत्सर्जन नियंत्रण तसेच कार्यप्रदर्शन आणि ऑपरेटिंग खर्च कार्यक्षमता याला प्राधान्य दिले आहे. या नवीन महिंद्रा सीएनजी ट्रॅक्टरची महिंद्रा रिसर्च व्हॅली चेन्नई येथे विकसित आणि चाचणी करण्यात आली आहे.