ऑटोमोबाईल

Mahindra SUV : महिंद्राची ही जबरदस्त एसयूव्ही येत्या आठवड्यात मार्केटमध्ये करेल एंट्री; टाटा पंच सारख्या नंबर वन कारला देईल टक्कर…

Mahindra SUV XUV300 : तुम्ही येत्या काही दिवसांत नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. देशांतर्गत कार उत्पादक महिंद्रा आपली एकमेव सब-कॉम्पॅक्ट SUV XUV300 ची फेसलिफ्ट आवृत्ती लवकरच लॉन्च करणार आहे. अशास्थितीत जर तुम्ही थोडी प्रतीक्षा केली तर तुम्हाला एक जबरदस्त SUV मिळू शकते.

आगामी महिंद्रा XUV300 चे नवीन नाव XUV3XO असे आहे, जे कंपनी 29 एप्रिल रोजी लॉन्च करेल. या सेगमेंटला गेल्या काही वर्षांपासून भारतीय ग्राहकांमध्ये सर्वाधिक मागणी आहे. या सेगमेंटमध्ये टाटा पंच, नेक्सॉन आणि मारुती ब्रेझा सारख्या एसयूव्ही आहेत. टाटा पंचने गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च २०२४ मध्ये कार विक्रीत अव्वल स्थान प्राप्त केले होते. अशातच महिंद्राची ही आगामी SUV टाटा पंचला जोरदार टक्कर देऊ शकते. या SUV मध्ये असे काय खास असेल चला जाणून घेऊया…

डिझाइन

आगामी महिंद्रा XUV3X0 चा पुढचा आणि मागचा भाग पूर्णपणे बदललेला असेल. याशिवाय एसयूव्हीच्या ग्रिल आणि हेडलॅम्पमध्येही बदल पाहायला मिळतील. तर एसयूव्हीचे अलॉय व्हीलही नव्या डिझाइनमध्ये दिसणार आहे.

आगामी महिंद्रा XUV3X0 ची सर्वात खास गोष्ट म्हणजे याला त्याच्या सेगमेंटमधील पहिले सर्वात मोठे पॅनोरामिक सनरूफ मिळणार आहे. याशिवाय, SUV मध्ये सुरक्षेसाठी पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 360-डिग्री कॅमेरा देखील मिळेल.

कारची पॉवरट्रेन कशी असेल?

जर आपण पॉवरट्रेनबद्दल बोललो तर, आगामी महिंद्रा XUV3X0 मध्ये विद्यमान 1.5-लीटर डिझेल इंजिनसह 1.2-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन दिले जाईल. तर कारचे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडले जाईल. भारतीय बाजारपेठेत आगामी एसयूव्ही मारुती सुझुकी ब्रेझा, टाटा नेक्सॉन, पंच, ह्युंदाई व्हेन्यू आणि किया सोनेट सारख्या एसयूव्हीशी स्पर्धा करेल.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts