ऑटोमोबाईल

कारमध्ये चहा किंवा कॉफी बनवा, मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर गॅझेट रिचार्ज करा! लवकरच येत आहे ह्युंदाईची भन्नाट कार

Hyundai Creta EV:-सध्या भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांनी उत्कृष्ट फीचर्स असलेल्या कार लॉन्च केल्या असून ग्राहकांना त्यांच्या आर्थिक बजेटमध्ये हवे असलेले फीचर्स मिळतील असे अनेक व्हेरियंट सध्या बाजारपेठेत आपल्याला दिसून येतात.तसेच आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये भारतीय कार बाजारपेठेमध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक कार देखील लॉन्च करण्यात येणार आहेत.

दिवसेंदिवस आता इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत असल्याच्या दृष्टिकोनातून या इलेक्ट्रिक कारची लॉन्चिंग ही खूप महत्त्वाची ठरणार आहे. अगदी याच पद्धतीने ह्युंदाई मोटार इंडियाची इलेक्ट्रिक क्रेटा 17 जानेवारीला भारतामध्ये लॉन्च केली जाणार असून नक्कीच ही कार भारतीय कार बाजारपेठेमध्ये एक महत्वाची कार ठरेल हे मात्र नक्कीच.

या कारमध्ये अनेक महत्त्वाचे असे फीचर समाविष्ट करण्यात आलेले आहेत व यामध्ये वापरण्यात आलेले फिचर जर बघितले तर याच्या मदतीने तुम्ही या ह्युंदाई क्रेटा ईव्हीमध्ये सहजपणे चहा, कॉफी बनवू शकणार आहात

तसेच मोबाईल फोनवर लॅपटॉप व इतर महत्त्वाचे गॅझेट देखील चार्ज करू शकतात. या कारमध्ये व्हेईकल टू लोड फीचर देण्यात आले आहे व या फिचरच्या मदतीने या सगळ्या गोष्टी शक्य होणार आहेत. हे फीचर लांबच्या प्रवासाकरिता खूप फायद्याचे ठरणार आहे.

किती रेंज देईल ह्युंदाई क्रेटा ईव्ही?
या कारमध्ये 51.4 kWh आणि 42 kWh क्षमतेचे दोन बॅटरी पॅक देण्यात येणार आहेत व हे बॅटरी पॅक अनुक्रमे सिंगल चार्जवर 472 आणि 390 किमीची रेंज ऑफर करेल. इतकेच नाही तर दहा टक्क्यांपासून ते 80% पर्यंत चार्ज होण्याकरिता या कारला फक्त 28 मिनिटांचा कालावधी लागेल.

परंतु याकरिता डीसी चार्जिंगची मदत घ्यावी लागेल. एसी होम चार्जिंगच्या मदतीने दहा ते शंभर टक्के चार्ज होण्यासाठी चार तासाचा कालावधी लागेल व ही कार फक्त 7.9 सेकंदामध्ये शून्य ते शंभर किमी प्रतितासाचा वेग पकडू शकते.

मिळालेल्या माहितीनुसार बघितले तर या ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकमध्ये 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅनोरेमिक सनरूफ, हवेशीर फ्रंट सीट, की लेस एन्ट्री, रियर एसी व्हेंट्स, वायरलेस फोन चार्जर यासारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बघितले तर या एसयूव्हीमध्ये सहा एअरबॅग्स, अँटी लॉक ब्रेकिंगसह EBD, ADAS लेव्हल तसेच हिल होल्ड असिस्ट व इएसपी सारखी फीचर्स पाहायला मिळतील. ही कार कंपनी वीस लाख रुपयांच्या आत लॉन्च करू शकते अशी एक शक्यता आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil