Maruti Cars Offer : मारुती सुझुकी देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीच्या लाखो कार दरमहिन्याला विकल्या जात आहेत. मारुती सुझुकीकडून देशातील पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी नवनवीन कार लाँच करत आहे.
तुम्हीही मारुती सुझुकीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच उत्तम संधी आहे. कारण मारुती सुझुकीकडून त्यांच्या कारवर बंपर ऑफर देण्यात येत आहे. 2023 मधील कारचा स्टॉक क्लिअर करण्यासाठी मारुतीकडून ही ऑफर देण्यात येत आहे.
मारुती सुझुकीकडून 2023 मध्ये तयार करण्यात आलेल्या कारची विक्री वाढवण्यासाठी ग्राहकांना मोठ्या ऑफर देण्यात येत आहेत. तुम्ही या महिन्यात मारुतीच्या कार खरेदी करून हजारो रुपयांची बचत करू शकता.
ग्रँड विटारा ऑफर
मारुती सुझुकीकडून त्यांच्या ग्रँड विटारा या लोकप्रिय एसयूव्ही कारच्या हायब्रिड आणि टर्बो-पेट्रोल कारच्या 2023 मॉडेलवर मोठी सूट दिली जात आहे. मारुती सुझुकीच्या ग्रँड विटारा एसयूव्ही कार लाँच झाल्यापासून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत कारची लाखो युनिट्स विकली गेली आहेत.
कारच्या हायब्रिड मॉडेलवर 79,000 रुपयांची आणि पेट्रोल मॉडेलवर 83,000 रुपयांची सूट दिली जात आहे. ग्रँड विटारा कारच्या या दोन्ही मॉडेलवर एक लाख रुपयांपेक्षा जास्त सूट देण्यात येत आहे.
इग्निस आणि सियाझ ऑफर
मारुती सुझुकीकडून 2023 मध्ये तयार करण्यात आलेल्या Ignis आणि Ciaz कारवर देखील मोठी सूट दिली जात आहे. इग्निस कारवर या महिन्यात 61,000 रुपयांची मोठी सूट दिली जात आहे तर Ciaz सेडान कारवर 48,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या दोन्ही कारवर तुम्ही 1 लाख रुपयांपेक्षा जास्त सूट मिळवू शकता.
जिमनी ऑफर
मारुती सुझुकीकडून त्यांच्या 2023 मध्ये तयार करण्यात आलेल्या Jimny एसयूव्ही मॉडेलवर 1.50 लाख रुपयांच्या अधिकृत सूट देण्यात येत आहे. Jimny थंडर एडिशनची तात्पुरती किंमत कमी करण्यात आली आहे. थंडर एडिशनवरील ऑफर बंद करण्यात आली आहे.