ऑटोमोबाईल

पैसे तयार ठेवा! लवकरच बाजारात दाखल होत आहे नवीन रूपातील मारुती स्विफ्ट; वाचा काय केलेत बदल?

मारुती सुझुकी अनेक नवनवीन प्रकारच्या कार मार्केटमध्ये सध्या लॉन्च करण्याच्या तयारीत असून आजपर्यंत मारुती सुझुकीने अनेक उत्तम अशी मॉडेल्स बाजारात ग्राहकांच्या सेवेशी सादर केलेले आहेत.

मारुती सुझुकी कंपनीच्या अनेक कार ग्राहकांच्या पसंतीच्या असून आजपर्यंत सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारमध्ये मारुती सुझुकीच्या कारचा समावेश आपल्याला करता येतो.

यामध्ये सर्वसाधारणपणे जर आपण पाहिले तर मारुती सुझुकी स्विफ्ट कार सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक कार असून आता मारुती सुझुकी ही कंपनी या कारची अपडेट आवृत्ती लॉन्च करणार आहे.

जर आपण मीडिया रिपोर्टनुसार बघितले तर येणाऱ्या काळामध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट फेसलिफ्ट एप्रिल ते जून या तिमाहीत लॉन्च केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चौथ्या पिढीतील मारुती स्विफ्ट जपान मोबिलिटी शो 2023 मध्ये प्रथम प्रदर्शित करण्यात आलेली होती. या लेखात आपण या मारुती स्विफ्ट फेसलिफ्ट कारच्या संभाव्य असलेल्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

 मारुती स्विफ्ट फेसलिफ्टचे डिझाईन असे असेल

मारुती सुझुकीची स्विफ्ट ही सर्वाधिक विक्री होणारी कार असून दर महिन्याला कार विक्रीच्या टॉप 10 कारच्या यादीमध्ये या कारचा समावेश केला जातो. आता येऊ घातलेल्या या अपडेटेड मारुती सुझुकी स्विफ्टच्या बाहेरील आणि आतील भागामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.

मीडिया रिपोर्टनुसार बघितले तर या अपडेटेड स्विफ्ट कारमध्ये नवीन एलईडी डीआरएल दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच येऊ घातलेल्या या अपडेटेड स्विफ्ट मध्ये नवीन एलईडी देण्यात येणार आहेत.

तसेच कारच्या सुरक्षेकरिता या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा सेटअप देखील दिला जाण्याची शक्यता आहे.

 सध्याच्या मारुती स्विफ्टमध्ये सीएनजीचा पर्याय देखील उपलब्ध आहे

मारुती स्विफ्ट च्या पावर ट्रेन बद्दल पाहिले तर सध्याच्या मॉडेलमध्ये 1.2 लिटर के सीरीज ड्युअल जेट, ड्युअल व्हिव्हीटी इंजिन देण्यात आले असून जे ९० बीएचपीची कमाल पावर आणि 113 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.

तसेच या कारचे इंजिन पाच स्पीड मॅन्युअल आणि पाच स्पीड आऊटोमॅटिक ट्रान्समिशन सह जोडलेले आहे. तसेच सध्याच्या मारुती स्विफ्टच्या मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये सीएनजीचा पर्याय देखील उपलब्ध आहे.

सध्याचे मारुती स्विफ्ट मॅन्युअल पेट्रोलवर 22.38 Kmpl आणि सीएनजीवर 30.9 Kmpl मायलेज देण्याचा दावा कंपनीच्या माध्यमातून करण्यात येतो.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts