Maruti Suzuki Baleno : मारुती सुझुकी कंपनीच्या कार देशात सर्वाधिक कार विक्रीच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. तसेच कंपनीकडून ग्राहकांना दिवसेंदिवस अनेक नवीन कार दिल्या जात आहेत. मारुती सुझुकी कंपनीच्या कार ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत.
सध्या मारुती सुझुकीच्या कार सर्वाधिक विक्री होत आहेत. तसेच ग्राहकांमध्ये देखील मारुती सुझुकीच्या कारची मागणी अधिक आहे. या कंपनीच्या कार स्वस्त आणि जबरदस्त मायलेज देत असल्याने ग्राहकांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत.
सध्या मारुती सुझुकी कंपनीच्या बलेनो कारच्या मागणीमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. या कारचे मायलेज जास्त असल्याने आणि किंमतही खूपच कमी असल्याने ग्राहकांमध्ये ही कार खरेदी करण्याची क्रेझ वाढत आहे.
कंपनीकडून या कारमध्ये नवीन नऊ-इंच स्मार्टप्ले प्रो+ इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी सॉफ्टवेअर अपडेट आणले आहे. तसेच या कारच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने बाकीच्या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.
मारुती सुझुकी बलेनोला बाजारात सर्वाधिक मागणी
मारुती सुझुकी बलेनोला बाजारात सर्वाधिक मागणी होत आहे. या कारमध्ये देण्यात आलेल्या फीचर्स, मायलेज आणि किंमत ग्राहकांना आकर्षित करत आहे. या कारची मार्च महिन्यामध्ये एकूण 16,168 युनिट्स विकली गेली आहेत.
तसेच या मारुती सुझुकी बलेनोला टक्का देणाऱ्या Hyundai i20 ने मार्चमध्ये फक्त 6,596 युनिट्सची विक्री केली आहे. त्यामुळे मारुती सुझुकी कंपनीच्या बलेनोला किती मागणी वाढली आहे हे तुमच्या या आकडेवारीवरून लक्षात येईल.
मारुती सुझुकी बलेनो किंमत
मारुती सुझुकी कंपनीच्या कार मायलेज आणि कमी किमतीची ओळखल्या जातात. सध्या सर्वाधिक खप होणारी बलेनो कारची एक्स-शोरूम किंमत 6.61 लाख रुपये आहे. या कारमध्ये सिग्मा, डेल्टा, झेटा आणि अल्फा व्हेरियंट पर्याय पाहायला मिळतात. प्रत्येक व्हेरियंटची किंमत ही वेगवगेळी आहे.
बलेनो कारची वैशिष्ट्ये
या कारमध्ये कंपनीकडून अनेक दमदार वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. नऊ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस ऍपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो, फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील आणि सेंट्रल कन्सोल अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
बलेनो कारमधील सुरक्षा वैशिष्ट्ये
आता मारुती सुझुकी कंपनीकडून प्रत्येक कार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात येत आहे. बलेनो कारला कंपनीकडून 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, मारुतीचा स्मार्टप्ले प्रो + कनेक्टिव्हिटी, क्रूझ कंट्रोल आणि मोठे अलॉय व्हील्स देण्यात येत आहेत.
बलेनो कारमधील इंजिन
मारुती सुझुकी कंपनीकडून बलेनो कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 88 BHP पॉवर आणि 113 NM टॉर्क जनरेट करते. तसेच ही कार 22.94 kmpl ते 30.61 km/kg मायलेज देते. या कारमध्ये 5-स्पीड गियर बॉक्स देण्यात आला आहे. ही कार सीएनजी सेगमेंटमध्ये देखील उपलब्ध आहे.