Maruti Suzuki Brezza CNG: देशाची सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने बाजारात मोठा धमाका करत सीएनजी सेंगमेंटमध्ये 2023 Maruti Suzuki Brezza S-CNG लाँच केली आहे . आम्ही तुम्हाला सांगतो तुम्हाला देखील ही कार खरेदी करण्याची असेल तर तुम्ही आता अवघ्या 25 हजारात 2023 Maruti Suzuki Brezza S-CNG साठी बुकिंग करू शकतात. बाजारात मारुती ब्रेझा ही सध्या फॅक्टरी-फिट सीएनजी किट असलेली एकमेव सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही असेल आणि LXi, VXi, ZXi आणि ZXi ड्युअल टोन या चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे.
मारुती सुझुकी ब्रेझा सीएनजीला पावर देण्यासाठी 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड ड्युअल-इंधन पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे. त्याची मोटर CNG मोडमध्ये 86.7 bhp आणि 121 Nm टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर AT शी जोडलेले आहे. ब्रेझा एस-सीएनजी ही मारुतीची पहिली सीएनजी कार असेल जी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनने सुसज्ज असेल.
मायलेजच्या बाबतीत, मारुती ब्रेझा S-CNG च्या मॅन्युअल व्हेरियंटपासून सुमारे 26 kmpl च्या इंधन कार्यक्षमतेचा दावा करते. मारुती टॉप-स्पेक ट्रिम्समध्ये सब-कॉम्पॅक्ट SUV चे CNG व्हेरियंट देखील ऑफर करेल. हे इलेक्ट्रिक सनरूफ, अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेसह टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम यांसारख्या अनेक पावरफुल फीचर्ससह सुसज्ज असेल.
मारुती सुझुकी ब्रेझ्झाच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ते चार व्हेरियंटमध्ये येते. LXi S-CNG ची किंमत 9.14 लाख रुपये आहे. VXi S-CNG ची किंमत 10.49 लाख रुपये आहे. ZXi S-CNG ची किंमत 11.89 लाख रुपये आहे. ZXi S-CNG ड्युअल टोनची किंमत 12.05 लाख रुपये आहे.
हे पण वाचा :- Lava Yuva 2 Pro : विश्वास बसेना ! ‘हा’ स्टायलिश फोन मिळत आहे 500 पेक्षा कमी किमतीमध्ये ; जाणून घ्या कसं