ऑटोमोबाईल

Maruti Suzuki Car Discount : बंपर कार ऑफर! मारुती सुझुकीच्या शानदार कारवर मिळतेय हजारोंची सूट, त्वरित घ्या लाभ

Maruti Suzuki Car Discount : देशातील ऑटो क्षेत्रामधील सर्वत मोठी कार उत्पादक आणि कार विक्री करणारी मारुती सुझुकी कंपनीकडून त्यांच्या अनेक कारवर बंपर ऑफर दिली जात आहे. त्यामुळे तुम्हीही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमची हजारो रुपयांची बचत होईल.

मारुती सुझुकीच्या कार देशभरात अधिक लोकप्रिय आहेत. मारुती सुझुकी कंपनी दरवर्षी लाखो कारची विक्री करून कार विक्री करण्याच्या यादीत अव्वल स्थान कायम टिकवून आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या कारवर किती सूट मिळत आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट

मारुती सुझुकीची लोकप्रिय कार स्विफ्टवर देखील हजारो रुपयांची सूट दिली जात आहे. ऑगस्ट महिन्यात 57,000 हजार रुपयांची सूट या कार्व्हर दिली जात आहे. मात्र या वेगवेगळ्या मॉडेलवर पेट्रोल AMT आणि LXI मॅन्युअल मॉडेलवर 52,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तर स्विफ्टच्या सीएनजी मॉडेलवर कंपनीकडून 22,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

मारुती सुझुकी अल्टो K10

मारुती सुझुकीची सर्वात स्वस्त आणि सर्वाधिक विक्री होणारी अल्टो K10 कारवर ग्राहकांना ऑगस्ट महिन्यामध्ये 57,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच या कारच्या सीएनजी मॉडेलवर 52,000 रुपयांची सूट दिली जात आहे.

मारुती सुझुकी एस-प्रेसो

मारुती सुझुकी कंपनीच्या एस-प्रेसो कारवर ग्राहकांना पेट्रोल आणि सीएनजी मॉडेलवर 56,000 रुपयापर्यंत सूट दिली जात आहे. त्यामुळे ग्राहक ही कार ख्ररेदी करून 56,000 रुपयांची बचत करू शकतात.

मारुती सुझुकी सेलेरियो

मारुती सुझुकी सेलेरियो कार सर्वाधिक मायलेजसाठी ओळखली जाते. या कारच्या पेट्रोल आणि सीएनजी मॅन्युअल मॉडेलवर 56,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. तसेच AMT मॉडेलवर 41,000 रुपयांची सीट दिली जात आहे.

मारुती सुझुकी वॅगन आर

मारुती सुझुकी कंपनीच्या वॅगन आर कारवर ग्राहकांना 51,000 रुप्यापर्यंतची सूट दिली जात आहे. या कारच्या सीएनजी कारवर 51,000 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच पेट्रोल मॉडेलवर 26,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे.

मारुती सुझुकी अल्टो 800

मारुती सुझुकी कंपनीच्या अल्टो 800 कारवर ऑगस्ट महिन्यात 15,000 रुपयांपर्यंत दिली जात आहे, तसेच सीएनजी मॉडेलवर 15,000 रुपयांची सूट दिली जात आहे. या खरेदी करून तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts