Maruti Suzuki Celerio Offer : जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात बजेट कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. खरे तर भारतात मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये बजेट फ्रेंडली आणि चांगल्या मायलेज देणाऱ्या कारची मागणी असते. यामुळे अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांनी भारतात उत्तम मायलेजच्या बजेट फ्रेंडली कार लॉन्च केल्या आहेत. यामध्ये मारुती सुझुकी या कंपनीचा देखील समावेश होतो.
मारुती सुझुकी ही देशातील सर्वाधिक कार विक्री करणारी ऑटो कंपनी. दरम्यान मारुती सुझुकी कंपनीने जुलै महिन्यात आपल्या एका लोकप्रिय हॅचबॅक कारवर हजारो रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध करुन दिला आहे.
यामुळे जर तुम्ही नवीन हॅचबॅक कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी स्वस्तात गाडी खरेदी करण्याची ही एक मोठी सुवर्णसंधी राहणार आहे. Maruti Suzuki जुलै 2024 मध्ये त्याच्या लोकप्रिय हॅचबॅक Celerio वर बंपर सूट देत असल्याची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार, ग्राहक जुलै महिन्यात मारुती सुझुकी सेलेरियो खरेदीवर 75,000 रुपयांपेक्षा जास्त बचत करू शकतात. म्हणजे या चालू महिन्यात ही हॅचबॅक कार खरेदी केली तर ग्राहकांना 75 हजाराचा डिस्काउंट मिळणार आहे.
या ऑफरमध्ये रोख सवलत, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट सूटचा समावेश राहणार आहे. दरम्यान आता आपण ही ऑफर नेमकी कशी आहे, कोणत्या व्हेरियंट वर किती डिस्काउंट मिळणार? याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणत्या व्हेरियंटवर किती डिस्काउंट
मारुती सुझुकी सेलेरियोच्या LXi (ड्रीम एडिशन) या व्हेरियंटवर 75,084 रुपयांचा डिस्काउंट उपलब्ध होणार आहे. मारुती सुझुकी सेलेरियो (पी) च्या मॅन्युअल ट्रान्समिशनवर 55,100 रुपयांची सूट मिळणार आहे.
Maruti Suzuki Celerio (P) AGS प्रकारावर एकूण 60,100 रुपयांची सूट उपलब्ध आहे. मारुती सुझुकी सेलेरिओचे सीएनजी व्हेरियंटवर 55,100 रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.
किंमत अन मायलेज किती
मारुती सुझुकीची ही हॅचबॅक कार देशातील बजेट फ्रेंडली गाड्यांमध्ये समाविष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बजेट फ्रेंडली कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 4.99 लाख रुपये आहे.
तसेच याच्या टॉप मॉडेल ची किंमत 7.09 लाख रुपये एक्स शोरूम एवढी आहे. या गाडीचे सीएनजी व्हेरियंट 35 किलोमीटर प्रति किलोचे मायलेज देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीकडून केला जात आहे.