Maruti Suzuki Jimny: 07 जून रोजी मारुती सुझुकीने आपली लोकप्रिय आणि बहुप्रतिक्षित ऑफ-रोड एसयूव्ही कार Maruti Suzuki Jimny भारतीय बाजारात लाँच केली आहे. सध्या बाजारात या कारला मोठी मागणी प्राप्त झाली आहे.
ग्राहक ही ऑफ-रोड एसयूव्ही कार खरेदीसाठी मोठी गर्दी करताना दिसत आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या कारमध्ये ग्राहकांना उत्तम फीचर्स आणि बेस्ट मायलेज तसेच जबरदस्त सेफ्टी फीचर्स मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात या कारकडे ग्राहक आकर्षित होताना दिसत आहे.
यातच तुम्ही देखील तुमच्यासाठी ही कार खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो सध्या या कारवर एक मस्त फायनान्स प्लॅन कंपनीशी संबंधित बँकांनी जाहीर केला आहे. ज्याच्या तुम्ही फायदा घेत आता ही कार फक्त 1.5 लाख रुपये भरून घरी आणू शकता. हे जाणून घ्या कि बाजारात ही कार महिंद्रा थारला टक्कर देत आहे.
कंपनीने या कारमध्ये दमदार इंजिन दिले आहे. यामध्ये 1.5-लिटर पेट्रोल इंजिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे इंजिन 105 PS कमाल पॉवर आणि 134 Nm पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. यासोबतच यामध्ये 6-स्पीड एमटी आणि 4-स्पीड एटी गिअरबॉक्सचा पर्यायही देण्यात आला आहे.
आता जर तुम्हाला ही एसयूव्ही खरेदी करायची असेल तर तुम्ही जिमनीची टॉप-एंड अल्फा एटी व्हेरियंट खरेदी करू शकता. त्याची सध्याची एक्स-शोरूम किंमत 14.89 लाख रुपये आहे. जर तुम्ही 17.20 लाख रुपयांच्या ऑन-रोड किमतीपैकी 1.72 लाख रुपयांचे डाउन पेमेंट भरले तर तुम्हाला 60 महिन्यांच्या कालावधीत एकूण 15.48 लाख रुपयांच्या कर्जाच्या रकमेसाठी अंदाजे 32,898 रुपये EMI म्हणून भरावे लागतील.
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की कंपनीने या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 12.74 लाख रुपये ठेवली आहे. त्याच वेळी त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 14.89 लाख रुपये खर्च करावे लागतील. म्हणूनच जर तुम्हाला ही नवीन लॉन्च झालेली कार खरेदी करायची असेल, तर हा फायनान्स प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. यासोबतच तुम्हाला उत्तम सेफ्टी फीचर्स देखील पाहायला मिळतील.
हे पण वाचा :- Brahma Muhurat: सावधान.. पहाटे 4 वाजता चुकूनही करू नका ‘हे’ काम; नाहीतर होणार धनहानी, वाचा सविस्तर