Maruti Suzuki New Electric Car : गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेज वाढली आहे. सरकार सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. यामुळे अनेक दिग्गज कंपन्यांनी भारतात इलेक्ट्रिक कार लाँच केल्या आहेत. सध्या भारतात इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनी बॉस आहे. टाटा कंपनीच्या सर्वाधिक इलेक्ट्रिक कार्स बाजारात पाहायला मिळतात.
पण आता ही मक्तेदारी तोडण्यासाठी मारुती सुझुकी देखील मैदानात उतरली आहे. मारुती सुझुकी ही भारतातील सर्वाधिक कार विक्री करणारी कंपनी. पण, सध्या या कंपनीकडे एकही इलेक्ट्रिक कार नाही. कंपनीचा पोर्टफोलिओ इलेक्ट्रिक कारविना सुना आहे. मात्र लवकरच हा दुष्काळ संपवला जाणार आहे.
कंपनी येत्या काही इलेक्ट्रिक मॉडेल्स लॉन्च करणार आहे. खरेतर, मारुती सुझुकी कंपनीच्या माध्यमातून बर्याच काळापासून याची तयारी सुरु आहे. मात्र कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार कधी लॉन्च होईल याची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. कंपनीने 2 वर्षांपूर्वी आपल्या इलेक्ट्रिक कारची झलक दाखवली होती.
आता येत्या 2 ते 3 वर्षात कंपनी या सेगमेंटमध्ये 2 ते 3 मॉडेल लॉन्च करेल अशी अपेक्षा आहे. कंपनीच्या या यादीमध्ये eVX, YMC MPV आणि eWX आधारित EV समाविष्ट आहेत. दरम्यान आज आपण मारुती सुझुकीच्या अपकमिंग eVX या आगामी इलेक्ट्रिक कार संदर्भात माहिती पाहणार आहोत.
कशी राहणार eVX ?
मारुती सुझुकी ही देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी पुढील वर्षी अगदी सुरुवातीलाच बाजारात ही कार लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याची बातमी हाती आली आहे. जानेवारी 2025 मध्ये eVX जागतिक स्तरावर लॉन्च केली जाऊ शकते.
कंपनी 17 ते 22 जानेवारी दरम्यान नवी दिल्ली येथे होणाऱ्या भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये उत्पादन-विशेष eVX SUV चे अनावरण करेल, असा दावा एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.
कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ते पुढील वर्षी जानेवारीमध्ये भारतात होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये BEV (बॉर्न इलेक्ट्रिक व्हेईकल) ची अधिकृत घोषणा करतील. ही गाडी 2025 च्या सुरुवातीला लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
त्याची लांबी अंदाजे 4,300 मिमी, रुंदी 1,800 मिमी आणि उंची 1,600 मिमी असू शकते. eVX च्या डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर ते कॉन्सेप्ट मॉडेलच्या तुलनेत खूप वेगळे असेल. त्याच्या मागील बाजूस संपूर्ण रुंदी कव्हर करणाऱ्या क्षैतिज एलईडी लाइट बार असतील.
याला हाय-माउंट स्टॉप लॅम्प, शार्क फिन अँटेना आणि स्लो अँटेना दिला जाणार आहे. त्याच्या बाहेरील भागाबद्दल बोलायचे झाले तर, याला समोरची विंडशील्ड, स्क्वेअर-ऑफ व्हील आणि वॉर्पच्या आत लपलेले मस्कुलर साइड क्लेडिंग मिळते.
यात 17-इंच अलॉय व्हील्स मिळतील. Suzuki eVX सिंगल आणि ड्युअल-इलेक्ट्रिक मोटर सेटअपमध्ये उपलब्ध राहील. eVX 60 kWh Li-ion बॅटरी पॅकसह सुसज्ज राहील जी सुमारे 500 किमीची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकते. चाचणी दरम्यान पाहिलेले फोटो दोन-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि ड्युअल-स्क्रीन लेआउट देखील दर्शवतात.