Maruti Suzuki SUV : भारतीय बाजारात सध्या SUV ला मोठया प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपल्या शानदार SUV लाँच करत आहेत. बाजारात एक अशी SUV आहे जिने नेक्सॉन, पंच, महिंद्रा स्कॉर्पियो आणि किआ सेल्टोस यांसारख्या कारला टक्कर दिली आहे.
मारुती सुझुकीची ही फ्रॉन्क्स SUV आहे. किमतीचा विचार केला तर कारची किंमत फक्त 7.47 लाख रुपये इतकी आहे. या कारमध्ये 22.89km/l पर्यंत मायलेज मिळते. तसेच या कारमध्ये कंपनीने अनेक भन्नाट फीचर्स दिली आहेत.
जाणून घ्या फ्रॉन्क्स इंजिन डिटेल्स
कंपनीच्या या शक्तिशाली फ्रॉन्क्सला 1.0-लिटर टर्बो बूस्टरजेट इंजिन मिळत आहे. त्यामुळे 5.3-सेकंदात 0 ते 60 किमी/ताशी वेग वाढतो. इतकेच नाही तर यात प्रगत 1.2-लिटर के-सीरीज, ड्युअल जेट, ड्युअल VVT इंजिन देण्यात आले आहे.
कारचे हे इंजिन स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञानासह येत असून ते पॅडल शिफ्टर्ससह 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडण्यात आले आहेत. यामध्ये ऑटो गियर शिफ्टचा पर्याय देखील तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच या कारचे मायलेज 22.89km/l पर्यंत मिळेल.
पहा भन्नाट फीचर्स
जर फ्रॉन्सच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, हेड-अप डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील, ड्युअल-टोन एक्सटीरियर कलर, 16-इंच डायमंड कट अलॉय व्हील तसेच वायरलेस चार्जर, वायरलेस स्मार्टफोनसह इन्फोटेनमेंट सिस्टमचा समावेश करण्यात आला आहे.
तर 6-स्पीकर साउंड सिस्टम, इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये रंगीत MID, उंची समायोजित करण्यायोग्य ड्रायव्हर सीट आणि मागील एसी व्हेंट्स, वेगवान USB चार्जिंग पॉइंट, कनेक्टेड कार वैशिष्ट्ये देण्यात आले आहे. त्याशिवाय मागील दृश्य कॅमेरा आणि 9-इंच टचस्क्रीन मिळेल. हे अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेला सपोर्ट करते.
सेफ्टी फीचर्स
वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी, कंपनीने या कारमध्ये साइड आणि कर्टन एअरबॅगसह ड्युअल एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट, रियर व्ह्यू कॅमेरा तसेच इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, 3-पॉइंट ईएलआर सीट बेल्ट, रिअर डीफॉगर, ISOFIX चाइल्ड सीट आणि अँटी थेफ्ट सिक्युरिटी सिस्टम दिली आहे.
हे लक्षात घ्या की फ्रॉन्सची अजूनही क्रॅश चाचणी झाली नाही. परंतु मारुती फ्रँक्सची लांबी 3995 मिमी, रुंदी 1765 मिमी आणि उंची 1550 मिमी इतकी देण्यात आली आहे. त्याचा व्हीलबेस 2520mm असून यात 308 लीटर बूट स्पेस मिळते.