Maruti Suzuki Electric SUV Car : देशात गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांना मोठी पसंती मिळू लागली आहे. सरकार देखील वाढते प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग, वाढते इंधनाचे दर, इंधनाचा लिमिटेड साठा या सर्व पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक वाहनांना विशेष प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी व्हावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. यामुळे आता देशातील अनेक नामांकित कार कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च करण्यास सुरुवात केली आहे.
विविध कंपन्यांनी आपल्या इलेक्ट्रिक कार बाजारात लॉन्च देखील केल्या आहेत. अशातच आता देशातील सर्वात मोठी कार कंपनी म्हणून ख्यातीप्राप्त असलेल्या मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनी ही इलेक्ट्रिक कार गुजरात मध्ये तयार करणार आहे.
यासाठी अहमदाबादपासून 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या हंसलपुर येथील कंपनीच्या सध्याच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये एक नवीन प्लांट तयार केला जाणार आहे. सध्या या ठिकाणी ए, बी आणि सी असे तीन प्लांट आहेत. आता येथे प्रोडक्शन लाईन या नावाने एक नवीन प्लांट उभारला जाणार आहे. आता आपण मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रॉनिक SUV कार केव्हा लॉन्च होणार आणि या गाडीची रेंज किती असणार हे पाहणार आहोत.
केव्हा लॉन्च होणार मारुती सुझुकीची पहिली EV
मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रॉनिक व्हेईकल ही एक SUV कार राहणार आहे. कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कॉर्पोरेट अफेयर्स राहुल भारती यांनी ही माहिती दिली आहे. तसेच ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक व्हेईकल आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये लॉन्च होईल अशी आशा आहे. यासाठी मारुती सुझुकी गुजरातच्या करंट कंपनीने गुजरात सरकार सोबत 2022 मध्ये एक करार सुद्धा केला आहे.
म्हणजेच याबाबतचा एम ओ यु म्हणजे मेमोरिंडोम ऑफ अंडरटेकिंग्स देखील करण्यात आला आहे. यानुसार कंपनी गुजरात मधील या प्लांटमध्ये 3100 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट करणार असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत मारुती सुझुकी आपल्या ग्राहकांसाठी आता इलेक्ट्रिक SUV देखील बाजारात आणणार आहे.
सिंगल चार्ज मध्ये किती किलोमीटर धावणार
मीडिया रिपोर्टनुसार ही गाडी पुढील वित्तीय वर्षात ग्राहकांसाठी बाजारात लॉन्च केली जाणार आहे. तसेच ही गाडी सिंगल चार्ज केल्यानंतर 550 किलोमीटर पर्यंत धावणार असे देखील सांगितले जात आहे. मारुती सुझुकीची ही पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही लॉन्ग रेंज प्रोव्हाइड करणार आहे. तथापि अजूनही या गाडीचे फीचर्स काय असतील, या गाडीची किंमत काय असेल ? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.