Maruti WagonR : देशातील ऑटो मार्केटमध्ये धुमाकूळ घालणारी आणि मारुती सुझुकीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कार्सपैकी एक असणारी मारुती वॅगनआरवर एक भन्नाट ऑफर जाहीर करण्यात आली आहे. तुम्ही देखील ही कार खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही आता ही कार फक्त 1 लाखात खरेदी करू शकणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि मारुती वॅगनआरच्या दरमहा हजारो युनिट्सची विक्री होते. कमी किमतीमध्ये जास्त मायलेज देणारी या कारची ओळख आहे. भारतीय बाजारात याची एक्स-शोरूम 5.53 लाख ते 7.41 लाख रुपये आहे. मात्र जर तुमच्यकडे इतकी रक्कम नसेल तर तुम्ही आता ही कार हप्त्यांवर देखील खरेदी करू शकतात. मारुती वॅगनआर खरेदीसाठी तुम्हाला आता फक्त एक लाख रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागणार आहे. चला मग जाणून घेऊया मारुती वॅगनआरवर उपलब्ध असणाऱ्या फायनान्स प्लॅनबद्दल संपूर्ण माहिती.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि भारतीय बाजारात ही कार 11 व्हेरियंटमध्ये LXi, VXi, ZXi आणि ZXi+ या ट्रिम लेव्हलमध्ये ऑफर केली जाते ज्यांच्या किंमती 5.53 लाख ते 7.41 लाख रुपये, एक्स-शोरूम आहेत. ही 5 सीटर हॅचबॅक कार 1197 सीसी पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे आणि ती CNG पर्यायामध्ये देखील उपलब्ध आहे. मारुती WagonR पेट्रोल व्हेरियंटसाठी 25.19 kmpl आणि CNG व्हेरियंटसाठी 34.05 km/kg मायलेज देते.
Maruti Suzuki WagonR ZXI Plus Downpayment Loan EMI
Maruti Suzuki WagonR चे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल WagonR ZXI Plus आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत 6.74 लाख रुपये आहे आणि ऑन-रोड किंमत 7,58,740 रुपये आहे. WagonR ZXI Plus ला रु. 1 लाख डाउन पेमेंटसह वित्तपुरवठा केल्यानंतर, कर्जाची रक्कम रु. 6,58,740 होईल.
जर तुम्ही WagonR ZXI Plus ला 5 वर्षांच्या कर्जावर वित्तपुरवठा केला आणि व्याज दर 9% असेल, तर पुढील 5 वर्षांसाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला EMI म्हणून 13,674 रुपये द्यावे लागतील. WagonR ZXI Plus ला वित्तपुरवठा करण्यासाठी सुमारे रु. 1.62 लाख व्याज आकारले जाईल. हे लक्षात ठेवा मारुती WagonR ZXI Plus खरेदीपूर्वी तुम्ही जवळच्या मारुती अरेना डीलरशिपला भेट देऊन वित्त तपशील तपासले पाहिजेत.
हे पण वाचा :- LIC Scheme: भारीच .. ‘या’ योजनेत करा फक्त 121 रुपयांची गुंतवणूक अन् मिळवा 27 लाखांचा परतावा ; जाणून घ्या कसं