ऑटोमोबाईल

Maruti Suzuki : मोठ्या कुटुंबासाठी मारुतीची ‘ही’ 7 सीटर कार एकदम उत्तम पर्याय, किंमतही अगदी बजेटमध्ये…

Maruti Suzuki : भारतात मोठ्या कुटुंबासाठी एका पेक्षा एक 7 सीटर कार उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका कारबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. जी तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. आम्ही सध्या मारुतीच्या एर्टिगा कार बद्दल बोलत आहोत, ही तुमच्या मोठ्या कुटुंबासाठी चांगला पर्याय आहे. आजच्या बातमीत आपण या कारची वैशिष्ट्ये आणि त्याची किंमत जाणून घेणार आहोत. चला तर मग…

या कारची किंमत परवडणारी आहे आणि ती चांगली मायलेज देखील देते. याशिवाय अनेक ॲडव्हान्स फीचर्सही देण्यात आले आहेत. Maruti Suzuki Ertiga MPV ची किंमत 8.69 लाख ते 13.03 लाख रुपये दरम्यान आहे. या कारची रचनाही खूपच आकर्षक आहे. हे LXI, VXI, ZXI सह विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

पॉवरट्रेन

नवीन Ertiga पेट्रोल आणि CNG पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. त्याचे 1.5-लिटर पेट्रोल इंजिन 103 PS कमाल पॉवर आणि 137 Nm पीक टॉर्क निर्माण करते. तर त्याचे सीएनजी मॉडेल ८८ पीएस पॉवर आणि १२१.५ एनएम पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

मारुती सुझुकी एर्टिगा MPV मध्ये 5-स्पीड मॅन्युअल / 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. त्याचे पेट्रोल व्हेरिएंट 20.3 ते 20.51 किमी प्रति लिटर आणि CNG प्रकार 26.11 किमी प्रति लिटरचे मायलेज देते. यामध्ये 7 जण आरामात प्रवास करू शकतात.

रंग

नवीन एर्टिगा 7-मोनोटोन रंगांमध्ये उपलब्ध आहे ज्यात मेटॅलिक मॅग्मा ग्रे, पर्ल मिडनाईट ब्लॅक, पर्ल आर्क्टिक व्हाइट यांचा समावेश आहे. यात 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, ऍपल कारप्ले, पॅडल शिफ्टर्स, क्रूझ कंट्रोल आणि ऑटो एसी यांसारखी अनेक खास वैशिष्ट्ये आहेत.

सुरक्षितता

मारुती सुझुकी एर्टिगा एमपीव्ही देखील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप चांगली आहे. यात 4 एअरबॅग्ज, ESP (इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम), रियर पार्किंग सेन्सर आणि हिल-होल्ड असिस्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. भारतीय बाजारपेठेत ती Kia Carens आणि Mahindra Marazzo MPV शी स्पर्धा करते.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts