Yamaha FZ S FI V4 : यामाहाने आपली लोकप्रिय मोटारसायकल FZ-S FI V4 लाँच केली आहे. ही स्पोर्टी कम्यूटर मोटारसायकल डार्क मॅट ब्लू आणि मॅट ब्लॅक अशा दोन नवीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. या बाईकची प्रारंभिक किंमत 1,28,900 रुपये (एक्स-शोरूम) आहे.
या कलर अपडेटव्यतिरिक्त कंपनीने या बाईकमध्ये इतर कोणताही बदल केलेला नाही. कलर अपडेटचे डिटेल्स जाणून घेतल्यानंतर त्याचे इंजिन, फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि मायलेज डिटेल्सही आपण याठिकाणी जाणून घेऊयात –
* Yamaha FZ-S FI V4 : इंजिन स्पेसिफिकेशन व मायलेज
एफझेड-एस मध्ये 149ccचे सिंगल सिलिंडर इंजिन आहे जे 7,250 आरपीएमवर 12.2 बीएचपी पॉवर आणि 5500 आरपीएमवर 13.3 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडले गेले आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 60 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज एआरएआयने प्रमाणित केले आहे.
* Yamaha FZ-S FI V4 चे ब्रेकिंग व सस्पेंशन
सस्पेंशन सिस्टीमबद्दल बोलायचे झाले तर समोर टेलिस्कोपिक फोर्क्स बसवण्यात आले आहेत आणि मागच्या बाजूला 7 स्टेप एडजस्टेबल मोनो-शॉक बसवण्यात आले आहेत. ब्रेकिंग सिस्टममध्ये फ्रंटमध्ये 282 एमएम डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 220 एमएम डिस्क ब्रेक देण्यात आला आहे, ज्यात सिंगल चॅनेल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम देण्यात आली आहे.
* Yamaha FZ-S FI V4 मधील फीचर्स व स्पेसिफिकेशन
फीचर्सचा विचार केला तर या बाइकमध्ये मल्टी फंक्शन एलसीडी इंस्ट्रूमेंट क्लस्टर, एलईडी हेडलाइट, टायर हगिंग रियर मडगार्ड, लोअर इंजिन गार्ड आणि ब्लूटूथ सपोर्टेड वाय-कनेक्ट ऍप सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फ्यूल टँकची 13 लीटरची कॅपेसिटी असून या बाईकचे वजन 136 किलो आहे.
* कंपनीचे म्हणणे काय आहे ?
यामाहा एफझेड-एस एफआय व्ही ४ नवीन कलर व्हेरिएंटसह लाँच करण्यामागचे कारण म्हणजे एफझेड-एस श्रेणीत नवीन कलर कॉम्बिनेशन सादर केल्याने सणासुदीच्या काळात विक्रीला निश्चितच चालना मिळेल. मेटॅलिक ग्रे, मॅजेस्टी रेड आणि मेटॅलिक ब्लॅक या सध्याच्या कलर कॉम्बिनेशन व्यतिरिक्त दोन नवीन शेड्स उपलब्ध असतील.