ऑटोमोबाईल

Nissan Magnite : 35 पैसे प्रति किमी देखभाल खर्च आणि जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह लाँच झाली ‘ही’ परवडणारी SUV, किंमत असणार..

Nissan Magnite : सध्या भारतीय बाजारात परवडणाऱ्या एसयूव्हीचे पर्याय वाढत असून निसानने आपल्या सर्वात जास्त विक्री करणाऱ्या मॅग्नाइट कारची विशेष आवृत्ती सादर केली आहे. कंपनीकडून आपल्या आगामी कारला Magnite GEZA असे नाव देण्यात आले आहे.

Magnite GEZA या स्पेशल एडिशनला प्रीमियम ऑडिओ आणि इन्फोटेनमेंट अनुभव कंपनीच्या नवीन ग्राहकांना अनुभवता येणार आहे. दरम्यान 35 पैसे प्रति किमी देखभाल खर्च आणि जबरदस्त सेफ्टी फीचर्ससह ही परवडणारी SUV लाँच झाली आहे.

दरम्यान जपानी थिएटर आणि त्याच्या भावनिक संगीताच्या थीम्सने प्रेरित असणारी मॅग्नाइट गेझा ही विशेष आवृत्ती खास इंफोटेनमेंट फीचर्ससह येते. आगामी कारमध्ये उच्च-रिझोल्यूशन 22.86 सेमी (9-इंच) टचस्क्रीन, वायरलेस कनेक्टिव्हिटीसह अँड्रॉइड कारप्ले, अॅप-आधारित नियंत्रणांसह सभोवतालची प्रकाश व्यवस्था, प्रीमियम जेबीएल स्पीकर्स, ट्रॅजेक्टोरी रिअर कॅमेरा तसेच शार्क फिन अँटेना, प्रीमियम बेज सीट अपहोल्स्ट्री इ.फीचर्सचा समावेश आहे.

जाणून घ्या स्पेशल एडिशनची प्रमुख फीचर्स:

  • उच्च रिझोल्यूशन 9 इंच टचस्क्रीन
  • वायरलेस कनेक्टिव्हिटीसह Android CarPlay
  • प्रीमियम जेबीएल स्पीकर्स
  • मार्गक्रमण मागील कॅमेरा
  • अॅप-आधारित नियंत्रणासह सभोवतालची प्रकाशयोजना
  • शार्क फिन अँटेना
  • प्रीमियम बेज कलर सीट अपहोल्स्ट्री

इंजिन

या कारच्या इंजिन मेकॅनिझममध्ये कोणताही बदल केला नाही. कंपनीची ही कॉम्पॅक्ट SUV 1.0-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल मॅन्युअल (72PS पॉवर आणि 96Nm टॉर्क), 1.0-लीटर टर्बो-पेट्रोल मॅन्युअल (100PS पॉवर आणि 160Nm टॉर्क) आणि 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल CVT इंजिनसह सादर झाली आहे.

तसेच त्याच्या नियमित मॉडेलमध्ये 8 इंच टचस्क्रीन, 7 इंच TFT सह संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, क्रूझ कंट्रोल पुश-बटण स्टॉप/स्टार्ट, JBL साउंड सिस्टम यासारखी जबरदस्त फीचर्स देण्यात आली आहेत.

असणार ही सेफ्टी फीचर्स

  • इलेक्ट्रॉनिक स्थिरता कार्यक्रम (ESP)
  • ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम (TCS)
  • हिल स्टार्ट असिस्ट (HSA)
  • टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS)

कंपनीकडून 2020 मध्ये प्रथम भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली होती. या कारची कमी किंमत, चांगली कामगिरी तसेच कमी देखभालीमुळे ही एसयूव्ही सेगमेंटमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे. परंतु मागील काही महिन्यांपासून या कारच्या विक्रीत घट झाली आहे. आता या नवीन स्पेशल एडिशनच्या लॉन्चमुळे कंपनीला त्याच्या विक्रीत सुधारणा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

खर्च फक्त 35 पैसे 

कंपनीचा असा दावा आहे की या एसयूव्हीचा मेंटेनन्सचा खर्च सेगमेंटमध्ये खूप कमी आहे. याचा देखभाल खर्च फक्त 35 पैसे/km (50,000 km साठी) असून कार 2 वर्षांची (50,000 किमी) वॉरंटीसह येते जी पाच वर्षांपर्यंत (किंवा एक लाख किमी) वाढवता येते.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts