ऑटोमोबाईल

आता विसराल रॉयल एनफिल्ड! हिरोची मॅव्हरिक स्क्रॅबलर 440 बाईक मार्केटमध्ये करेल धमाल; वाचा या बाईकची वैशिष्ट्ये आणि किंमत

Hero Mavrick Scrambler 440 Bike:- भारतीय बाईक बाजारपेठेमध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांनी धमाकेदार आणि जबरदस्त परफॉर्मन्स असलेल्या बाईक सध्या लॉन्च केल्या असून यामध्ये सर्वच प्रमुख आणि लोकप्रिय असलेल्या बाईक उत्पादक कंपन्यांच्या बाईकचा समावेश आहे.

यामध्ये काही हजार रुपयांपासून तर लाखो रुपयांपर्यंतच्या बाईक सध्या विक्रीसाठी उपलब्ध असून ग्राहकांना देखील त्यांचा आर्थिक बजेट आणि आवश्यक असलेले फिचर्स असलेली बाईक निवडीमध्ये खूप वेगवेगळे पर्याय निर्माण झाले आहेत. यामध्ये होंडा पासून तर हिरोपर्यंत आणि टीव्हीएस पासून तर रॉयल एनफिल्डपर्यंत अनेक कंपन्यांच्या बाईकचा समावेश आपल्याला करता येईल.

या कंपन्यांमध्ये जर रॉयल एनफिल्ड या कंपन्यांच्या बाईकचा विचार केला तर आजच्या तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर या कंपनीच्या बाईकच्या बाबतीत क्रेझ असल्याचे दिसून येते. रॉयल एनफिल्डच्या जवळपास सर्वच बाईक या खूपच लोकप्रिय आणि तितक्याच प्रसिद्ध देखील आहेत.

परंतु आता या रॉयल एनफिल्डच्या बाईक ना टक्कर देऊ शकेल अशी एक बाईक हिरो मोटोकॉर्प कडून भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली जाणार आहे व ही बाईक मॅव्हरीक 440 स्क्रम्बलर या नावाने ओळखली जाणार आहे.

साधारणपणे हिरोचे सध्या बाजारात असलेल्या मावरीक 440 या बाईकवर आधारित असणार आहे. परंतु या दोन्ही बाइक मधील महत्वाचा फरक हा लूक आणि डिझाईनमध्ये असेल अशी एक शक्यता आहे. तसेच नवीन लॉन्च करण्यात येत असणाऱ्या या बाईकमध्ये आधीच्या मावरीक पेक्षा नक्कीच वेगळी डिझाईन आणि फरक बघायला मिळणार आहे.

काय असतील या बाईकमध्ये संभाव्य फीचर्स?
मिळालेल्या माहितीनुसार बघितले तर हिरोच्या या आगामी येऊ घातलेल्या मॅव्हरिक 440 स्क्रॅम्बलर बाईकला लहान फ्राय स्क्रीन आणि हँडल बास ब्रेसेस दिले जातील. त्यामुळे या बाईकचा हार्ड लूक ग्राहकांना पाहायला मिळेल. तसेच या बाईकला टेन स्पोक डिझाईनसह नवीन अलॉय विल्स दिले जातील अशी देखील एक शक्यता आहे.

तसेच या बाईकला 19 इंचाचे अलॉय व्हिल देण्यात येऊ शकतात. त्यामुळे ही बाईक चालवताना हलकासा ऑफ रोडचा अनुभव घेता येऊ शकतो.तसेच हिरोच्या या नव्या बाईकमध्ये दमदार क्रॅश गार्ड मिळेल जो गाडीच्या पेट्रोल टाकीच्या खालच्या भागापासून इंजिनच्या भागापर्यंत लावण्यात आलेला आहे.

तसेच या बाईकमध्ये नवीन ट्यूबलर ग्रॅब हँडल देण्यात आले आहेत. इंजिनच्या बाबतीत बघितले तर अद्याप पर्यंत कंपनीकडून इंजिन बाबत कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही.

किती राहू शकते या बाईकची किंमत?
जर आपण मार्केटमध्ये असलेल्या हिरोच्या मॅवरिक 440 ची एक्स शोरूम किंमत बघितली तर ते एक लाख 99 हजार ते दोन लाख चोवीस हजार रुपये दरम्यान आहे.

त्यामुळे स्क्रॅम्बलर व्हर्जनची किंमत देखील अशीच असेल अशी एक शक्यता आहे. मॅवरिक 440 च्या तुलनेत स्क्रॅबलरची किंमत थोडी जास्त असू शकते अशी एक शक्यता आहे. परंतु कंपनीच्या माध्यमातून अजून या नवीन बाईकची किंमत सांगण्यात आलेले नाही.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts