Ola Electric Car : ओला इलेक्ट्रिक लवकरच बाजारात (Market) त्यांनी नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च (Launch) करणार आहे. आता कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल (Bhavish Agarwal) यांनी आगामी इलेक्ट्रिक कारच्या किंमतीबद्दल (Price) माहिती दिली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओला इलेक्ट्रिकचे सीईओ आणि सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांनी कंपनीच्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची किंमत 40 ते 50 लाख रुपयांच्या दरम्यान असल्याची पुष्टी केली आहे.
याशिवाय अग्रवाल यांनी असेही म्हटले आहे की “ओलाची उत्पादन श्रेणी दुचाकींसाठी 1 लाख रुपयांपासून ते प्रीमियम इलेक्ट्रिक कारसाठी 40 ते 50 लाख रुपयांपर्यंत सुरू होईल.
अशा प्रकारे कंपनी मध्यम आकाराची इलेक्ट्रिक वाहने, लहान वाहने यांना लक्ष्य करत आहे. प्रिमियम इलेक्ट्रिक कार विभागातील जागतिक आघाडीवर आहे. अग्रवाल यांच्या मते, कंपनीकडे कार स्पेसमध्ये काम करण्यासाठी निश्चितपणे संपूर्ण रोडमॅप तयार आहे.
ओला कारला 500 किमीची रेंज मिळेल
ओला कारची खासियत म्हणजे एका चार्जमध्ये 500 किमीची रेंज आहे. या कारसाठी असा दावा करण्यात आला आहे की 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडण्यासाठी फक्त 4 सेकंद लागतात. ही आतापर्यंतची सर्वात स्पोर्टी कार असल्याचेही सांगितले जात आहे आणि ती सर्व काचेच्या छताने सुसज्ज असेल.
ओलाची सर्वात स्वस्त स्कूटरही लॉन्च करण्यात आली आहे
दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी ओलाने त्यांची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर S1 देखील लॉन्च केली आहे. त्याची किंमत फक्त 99,999 रुपये आहे आणि तुम्ही 499 रुपये देऊन ही स्कूटर बुक करू शकता.
या नवीन स्कूटरमध्ये, तुम्हाला S1 Pro सारखीच स्मूद बॉडी स्टाइल पाहायला मिळते, तर बॅटरी पॅक म्हणून 3 KWh बॅटरी आहे. हा पॅक एका चार्जवर 131 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. तसेच, यात इको मोड, नॉर्मल मोड आणि स्पोर्ट्स मोड असे तीन रायडिंग मोड आहेत.