OLA New Motorcycle Launch : टू व्हीलरच्या इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये ओला इलेक्ट्रिकने भारतीय बाजारपेठेत कमी दिवसात आपले नाव केले आहे. या कंपनीचा या सेगमेंटमध्ये मोठा बोलबाला आहे यात शंकाच नाही. या कंपनीच्या अनेक इलेक्ट्रिक स्कूटर ग्राहकांच्या पसंतीस खऱ्या उतरल्या आहेत. दरम्यान आता कंपनीने आपली इलेक्ट्रिक बाईक रोडस्टरचे तीन व्हेरियंट लॉन्च केले आहेत.
महत्त्वाचे म्हणजे कंपनीने या नवीन इलेक्ट्रिक बाइकचे बुकिंग सुद्धा सुरू केले आहे. यामुळे ज्यांना येत्या काही दिवसांनी नवीन इलेक्ट्रिक बाइक खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी कंपनीच्या या बाईक्स बेस्ट ऑप्शन ठरणार आहेत.
विशेष म्हणजे कंपनीने लॉन्च केलेल्या या बाईकची किंमत ग्राहकांच्या बजेटमध्ये असणार आहे. कंपनीने सांगितल्याप्रमाणे या गाड्यांची डिलिव्हरी जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. म्हणजेच नवीन वर्षात इलेक्ट्रिक बाइक खरेदी करणाऱ्यांसाठी ओला कंपनीची ही बाईक फायदेशीर ठरणार आहे.
ओला इलेक्ट्रिकने आपल्या इलेक्ट्रिक बाइक रोडस्टरचे तीन प्रकार रोडस्टर प्रो, रोडस्टर आणि रोडस्टर एक्स लाँच केले आहेत. दरम्यान आता आपण या तिन्ही इलेक्ट्रिक बाइकचे फीचर्स अन किंमती थोडक्यात जाणून घेणार आहोत.
रोडस्टर X : रोडस्टर X ही या लाईन अपची सर्वात स्वस्त गाडी आहे. ही गाडी सर्वसामान्यांना परवडणार असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. कंपनीने या गाडीची किंमत 80,000 हून कमी ठेवली आहे. या गाडीची किंमत 2.5kWh बॅटरीसाठी 74,999 रुपयांपासून सुरू होते.
ही बाईक 2.8 सेकंदात 0 ते 40 पर्यंत वेग पकडू शकते. त्याचा टॉप स्पीड 124 किलोमीटर प्रति तास आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही गाडी 200 किलोमीटरपर्यंत धावू शकते. यात 18 इंच अलॉय व्हील आणि 4.3 इंच टचस्क्रीन आहे. या गाडीची डिलिव्हरी सुद्धा पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू होणार आहे.
रोडस्टर : रोडस्टरची किंमत 2.5kWh बॅटरीसाठी 1,04,999 रुपये, 4.5kWh बॅटरीसाठी 1,19,999 रुपये आणि 6kWh बॅटरीसाठी 1,39,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक 2.2 सेकंदात 0 ते 40 पर्यंत वेग पकडू शकते. त्याचा टॉप स्पीड 126 किलोमीटर प्रति तास आहे.
ही गाडी एका चार्जवर 579 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यात 7 इंची टचस्क्रीन आणि डायमंड कट अलॉय व्हील्स आहेत. या गाडीची डिलिव्हरी पुढील वर्षी जानेवारीपासून सुरू होणार आहे.
रोडस्टर प्रो : रोडस्टर प्रो हे या लाईनअपचे टॉप मॉडेल राहणार आहे. या गाडीची किंमत 8kWh बॅटरीसाठी 1,99,999 रुपये आणि 16kWh बॅटरीसाठी 2,49,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक केवळ 1.2 सेकंदात 0 ते 40 पर्यंत वेग पकडते असा दावा आहे.
या गाडीचा टॉप स्पीड 194 किलोमीटर प्रति तास असून ही बाईक एका चार्जवर 579 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे. मात्र या गाडीची डिलिव्हरी थोडी उशिराने मिळणार आहे. पुढील वर्षी म्हणजेच 2025 च्या दिवाळीपासून ही गाडी डिलिव्हरी साठी उपलब्ध राहील.