New Maruti Dzire Finance Plan:- कार घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु बऱ्याच कारच्या किमती या जास्त असल्यामुळे प्रत्येकालाच कार घेणे शक्य होत नाही.परंतु बरेचजण कर्जाचा पर्याय अवलंबतात व कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करतात. यामध्ये आपल्याला माहित आहे की निश्चित एक डाऊन पेमेंट भरून बाकीची रक्कम फायनान्स केली जाते व कार घेतली जाते.
घेतलेल्या कर्जाचे नंतर प्रत्येक महिन्याला ठराविक स्वरूपात एक निश्चित ईएमआय भरावा लागतो. अशाच प्रकारे तुम्हाला देखील मारुती सुझुकी ऑल न्यू डिझायर सेडान विकत घ्यायची असेल तर तुम्ही ती एक लाख रुपयांच्या डाऊन पेमेंट वर घेऊ शकतात.
त्यामुळे ही कार जर तुम्हाला लोन घेऊन घ्यायची असेल तर तिचा फायनान्स प्लान कसा राहील किंवा किती ईएमआय भरावा लागेल? याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.
कशी आहे ऑल न्यू मारुती डिझायर?
या कारची एक्स शोरूम किंमत सहा लाख 79 हजार रुपये पासून ते दहा लाख 14 हजार रुपयांपर्यंत आहे. विशेष म्हणजे कंपनीने ही कार LXI, VXI, ZXI, आणि ZXI+ सारख्या ट्रिमसह नऊ व्हेरियंटमध्ये उपलब्ध करून दिली आहे. तसेच कंपनीने या कारमध्ये सीएनजी ऑप्शन देखील दिला आहे.
नवीन मारुती डिझायर LXI मॅन्युअल पेट्रोल कारची किंमत तसेच डाऊनपेमेंट आणि ईएमआय तपशील
नवीन मारुती डिझायरचे बेस व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत सहा लाख 79 हजार रुपये असून ऑन रोड किंमत सात लाख 64 हजार पर्यंत जाते. तुम्हाला जर LXI मॅन्युअल पेट्रोल व्हेरियंट एक लाख रुपये डाऊन पेमेंट करून खरेदी करायचे असेल तर त्या करता तुम्हाला सहा लाख 66 हजार रुपयांचे लोन घ्यावे लागेल.
जर हे लोन तुम्ही पाच वर्ष कालावधीसाठी घेतले तर यावर दहा टक्के दराने व्याज लागेल. या हिशोबाने जर बघितले तर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 14108 इतका ईएमआय भरावा लागेल. याप्रकारे तुम्हाला पाच वर्षात जवळपास एक लाख 82 हजार रुपये व्याज द्यावे लागेल.
नवीन मारुती डिझायर VXI पेट्रोल मॅन्युअलचे ईएमआय डिटेल्स
नवीन मारुती डिझायर VXI पेट्रोल व्हेरियंटची एक्स शोरूम किंमत सात लाख 79 हजार रुपये असून त्याची ऑन रोड किंमत आठ लाख 75 हजार रुपयांपर्यंत जाते. हे व्हेरियंट जर तुम्ही एक लाख रुपयांचे डाऊन पेमेंट करून घेत असाल तर त्याकरिता तुम्हाला सात लाख 75 हजार रुपयांचे लोन घ्यावे लागेल.
हे कर्ज जर तुम्ही पाच वर्षांकरिता घेत असाल तर त्यावर दहा टक्के या दराने तुम्हाला व्याज आकरण्यात येईल. या आकडेवारीनुसार महिन्याला तुम्हाला 16466 रुपये ईएमआय भरावा लागेल. या हिशोबाने तुम्हाला पाच वर्षात 2 लाख 13 हजार रुपये इतके व्याज यावर भरावे लागू शकते.