Swaraj 825 XM Tractor:- आज-काल शेतीची सर्वच कामे बऱ्याचअंशी ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पूर्ण केली जातात. मोठ्या प्रमाणात आता ट्रॅक्टरचा उपयोग शेतीमध्ये केला जात असल्याने शेतीची अनेक कामे कमीत कमी खर्चात आणि कमी वेळेत करता येणे शक्य झाले आहे व शेतकऱ्यांचे कष्ट देखील यामुळे बऱ्याच प्रकारे कमी झाले आहेत.
त्यामुळे आता शेती कामासाठी शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टर खरेदीकडे मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. जर आपण भारतीय ट्रॅक्टर बाजारपेठ पाहिली तर यामध्ये अनेक कंपन्यांची उत्कृष्ट असे ट्रॅक्टर आहेत या कंपन्यांमध्ये स्वराज ही कंपनी देखील खूप महत्त्वाची असून या कंपनीचे ट्रॅक्टर देखील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहेत.
त्यामुळे तुम्हाला देखील जर शेतीकामासाठी पावरफुल ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुमच्याकरिता स्वराज 825 XM हा ट्रॅक्टर खूप उत्कृष्ट असा पर्याय ठरेल. हा ट्रॅक्टर तीस एचपी पावर निर्माण करणारा असून या श्रेणीतील उत्तम ट्रॅक्टर आहे.
काय आहेत स्वराज 825 XM ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये?
या ट्रॅक्टरमध्ये चार स्ट्रोक, डायरेक्ट इंजेक्शन 1537 सीसी क्षमतेचे सिंगल सिलेंडरमध्ये डिझेल इंजन देण्यात आले असून 30 अश्वशक्ती निर्माण करते व हा ट्रॅक्टर तीन स्टेज ऑइल बाथ टाइप एअर फिल्टरसह येतो. त्यामुळे इंजिनचे धुळी पासून उत्तमरीत्या संरक्षण होते.
या ट्रॅक्टरची पीटीओ पावर 21.3 एचपी आहे व इंजिन जवळपास १६५० आरपीएम जनरेट करते. तसेच कंपनीने या ट्रॅक्टरमध्ये 60 लिटर क्षमतेची मोठी इंधन टाकी दिली आहे. या ट्रॅक्टरची हायड्रोलिक पावर 1000 किलो इतकी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एकाच वेळी जास्त प्रमाणात शेतीमाल वाहून नेण्यास मदत होते.
1870 किलो वजनाचे हे ट्रॅक्टर असून त्याची लांबी 3260 मिमी व रुंदी 1930 मीमी इतकी आहे. तसेच या ट्रॅक्टरमध्ये आठ फॉरवर्ड व दोन रिव्हर्स गिअर्स असलेला गिअरबॉक्स देण्यात आला आहे. क्लच देखील वैशिष्ट्यपूर्ण असून यामध्ये सिंगल ड्राय फ्रिक्सन प्लेट क्लच देण्यात आला आहे.
ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 3.08 ते 28.40 किमी प्रतितास आणि रिव्हर्स स्पीड 2.71 ते 9.34 किमी प्रतितास इतका ठेवण्यात आला आहे. कंपनीचा हा ट्रॅक्टर ड्राय डिस्क प्रकारच्या ब्रेकसह येतो जो निसरड्या पृष्ठभागावर देखील टायरवर मजबूत पकड ठेवण्यास सक्षम आहे. हे ट्रॅक्टर दोन व्हील ड्राईव्हमध्ये येते.
किती आहे स्वराज 825 XM ट्रॅक्टरची किंमत आणि वारंटी?
भारतीय व्यावसायिक वाहनांच्या बाजारपेठेमध्ये या ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत चार लाख 13 हजार रुपये ते पाच लाख 51 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्समुळे या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत काही राज्यांमध्ये बदलू शकते. तसेच कंपनीने या ट्रॅक्टरला दोन वर्षांची वॉरंटी दिली आहे.