ऑटोमोबाईल

Punch EV : अवघ्या 21 हजारांत घरी आणा पंच EV ! बुकिंग सुरु, मिळणार हे फीचर्स

Punch EV : टाटा मोटर्सची बहुचर्चित इलेक्ट्रिक मिनी एसयूव्ही पंच कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर करण्यात आली आहे. टाटा मोटर्स त्यांच्या नवनवीन इलेक्ट्रिक कार सध्या भारतात सादर करण्यावर अधिक भर देत आहे.

टाटा मोटर्सने त्यांची पंच EV कार Gen-2 प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे. टाटा पंच EV कार अनेकदा चाचणी दरम्यान दिसून आली आहे. आता कंपनीकडून कार सादर केली आहे. कारमध्ये अनके प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. मोठ्या बदलांसह पंच EV कार सादर करण्यात आली आहे.

Punch EV बुकिंग तपशील

टाटा मोटर्सच्या पंच EV कारचे बुकिंग सुरु करण्यात आले आहे. पेट्रोल आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही व्हेरियंट असणारी टाटाची ही दुसरी एसयूव्ही कार असेल. पंच कारमध्ये अलीकडेच सीएनजी पर्याय देखील दिला आहे. तुम्हालाही पंच EV कार खरेदी करायची असेल तर तुम्ही अवघ्या 21,000 हजारांमध्ये ती बुक करू शकता.

पंच EV डिझाईन

टाटा मोटर्सकडून त्यांची पंच EV कारचे डिझाईन देखील सादर करण्यात आले आहे. कारमध्ये स्लिम एलईडी हेडलाइट्स, बंद लोखंडी जाळी, नवीन अलॉय व्हील डिझाइन आणि कनेक्ट केलेले एलईडी टेललाइट्स देण्यात आले आहे.

प्लॅटफॉर्म, बॅटरी आणि संभाव्य रेंज

टाटा मोटर्सकडून त्यांच्या पंच EV कारमध्ये मजबूत बॅटरी पॅक देण्यात आला आहे. Gen-2 प्लॅटफॉर्मवर पंच EV कार विकसित करण्यात आली आहे. सिंगल चार्जमध्ये 300 किमी रेंज देण्यात आली आहे. 150kW DC फास्ट चार्जरसह कार लवकरच लाँच केली जाईल.

पंच EV संभाव्य वैशिष्ट्ये

पंच EV कारमध्ये प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. 7.2 kW फास्ट होम चार्जर, हवेशीर फ्रंट सीट्स, इलेक्ट्रिक सनरूफ, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, 10.23-इंच व्हर्च्युअल कॉकपिट आणि 360 डिग्री कॅमेरा यासह अनेक फीचर्स कारमध्ये दिले जाणार आहेत. तसेच पंच EV एसयूव्ही कारची पाच व्हेरियंट सादर केली जाणार आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts