ऑटोमोबाईल

एखादी सीएनजी एसयूव्ही कार घ्यायची आहे का? तर टाटा पंच सीएनजी घ्याल की ह्युंदाई एक्स्टर सीएनजी? कोणती राहील बेस्ट?

सध्या मोठ्या प्रमाणावर कार बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे अनेक वैशिष्ट्य असलेली कार मॉडेल्स लॉन्च केले जात असून त्यामध्ये काही इलेक्ट्रिक आहेत तर काही सीएनजी कारचा समावेश आपल्याला यामध्ये करता येईल. त्यात जर भारताच्या दृष्टिकोनातून बघितले तर जे एसयूव्ही कारनिर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये एक तगडी स्पर्धा आपल्याला दिसून येते.

कारण भारतीय कार बाजारपेठेमध्ये एसयूव्ही कार्सना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे व ही मागणीला हेरून अनेक प्रसिद्ध कार उत्पादक कंपन्यांकडून अशा वैशिष्ट्ये पूर्ण एसयूव्ही कार उत्पादित केल्या जात आहे.

यामध्ये जर आपण ह्युंदाई आणि टाटा मोटर्स या प्रसिद्ध कार उत्पादक कंपन्यांच्या दृष्टिकोनातून बघितले तर अनेक लोकप्रिय मॉडेल्स सादर करण्यात आलेले आहेत व हटाटा पंच आणि हुंडाई या कंपनीने Exter सीएनजी प्रकारामध्ये सादर केलेली आहे. तुम्हाला देखील सीएनजी प्रकारातील एखादी एसयुव्ही विकत घ्यायची असेल तर तुम्हाला टाटाची पंच सीएनजी फायद्याची ठरेल की ह्युंदाई एक्स्टर सीएनजी? त्याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.

 कसे आहे या दोन्ही कारचे डायमेन्शन?

जर आपण टाटा मोटरची प्रसिद्ध असलेली टाटा पंच पहिली तर ही एक पारंपारिक म्हणजेच ट्रॅडिशनल एसयूव्ही असून ह्युंदाई या कंपनीच्या एक्स्टर सीएनजी कारपेक्षा लांबीने व रुंदीने जास्त आहे. टाटा पंचची लांबी 3827 मीमी तर रुंदी 1742 मीमी आहे.

त्या तुलनेत ह्युंदाई एक्स्टर सीएनजी ची लांबी 3815 मीमी व रुंदी 1710 मीमी आहे. जर आपण टाटा पंचची उंची पाहिली तर ती 1715 मीमी आहे तर एक्स्टरची  1631 मीमी आहे. टाटा पंचचा ग्राउंड क्लिअरन्स 187 मीमी असून एक्स्टरचा 185 मीमी आहे.

 कसे आहेत या दोन्ही कारचे फिचर्स?

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून फीचर्स पाहिले तर ह्युंदाईच्या एक्स्टरमध्ये सहा एयर बॅग देण्यात आलेले आहेत. टायर प्रेशर मॉनिटर, मध्ये असलेल्या सर्व पाच सीटला आयएसओएफआयएक्स सीट अँकर देण्यात आलेले आहे व या कारला रिवर्स पार्किंग कॅमेरा, मागच्या बाजूला सेंसर आणि ऑटोमॅटिक हेडलाईट देण्यात आलेले आहेत.

एवढेच नाही तर या कार मध्ये तीन पॉईंट सिट बेल्ट असून ह्युंदाई वायरलेस अँड्रॉइड ऑटो, एप्पल कार प्ले देण्यात आलेले आहे. त्यासोबतच स्टिअरिंग माऊंटेड कंट्रोल्स, दोन पावर सॉकेट्स, समोरच्या बाजूला एक फास्ट चार्जर टाईप सी पोर्ट आणि आठ इंचाची इन्फोटेनमेंट सिस्टम इत्यादी महत्त्वाचे वैशिष्ट्ये यामध्ये आहेत. त्या तुलनेत….

 टाटा पंच बद्दल पाहिले तर या कारला नुकतीच ग्लोबल एनसीएपी चाचणीमध्ये तिला पाच स्टार सुरक्षा रेटिंग प्रदान करण्यात आलेले आहे व हे प्रकारचे रेटिंग मिळवणारे एकमेव वाहन आहे. क्रॅश टेस्ट मधून प्रौढ प्रवाशांकरिता पाच स्टार तर लहान मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून या कारला चार स्टार रेटिंग देण्यात आलेले आहे.

या कारमध्ये ट्वीन एअर बॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, साईड हेड इम्पॅक्ट प्रोटेशन सिस्टम, कारमध्ये असलेल्या सर्व सिटला तीन पॉईंट बेल्ट, रियर पार्किंग सेन्सर आणि एक मागच्या बाजूला कॅमेरा देण्यात आलेला आहे. तसेच रेन सेंसिंग वायपर्स, फ्रंट आर्मरेस्ट, यूएसबी, टाईप शिफ्ट पोर्ट आणि सहा स्पीकर सह हरमनची सात इंचाची एन्फोटेनमेंट सिस्टम देखील देण्यात आलेली आहे.

 कसे आहे या दोन्ही सीएनजी कारची इंजिन?

इंजिन बद्दल बोलायचे झाले तर टाटा पंच आयसीएनजीचे इंजिन 1.2 लिटर, 3 सिलेंडर असलेले असून ते ७२.५ बीएचपी पावर आणि 103 एनएम टॉर्क जनरेट करते. तसेच या कारला पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आलेले आहे व तिचे मायलेज 26.99 किलोमीटर प्रति किलोग्रॅम इतके आहे.

त्या तुलनेत ह्युंदाई एक्स्टर सीएनजी बद्दल पाहिले तर या कारमध्ये 1.2 लिटर, चार सिलेंडर इंजन देण्यात आलेले आहे व ते 68 बीएचपी  पावर आणि 95.2 एनएम टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये पाच स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आलेले आहे व ही 27.1 किलोमीटर प्रति किलोग्रॅम मायलेज देते.

 किती आहे या दोन्ही सीएनजी कारची किंमत?

या दोन्ही कारच्या किमती बद्दल तुलनात्मक पाहिले तर टाटा पंच आयसीएनजीची किंमत सात लाख तेवीस हजार रुपये इतकी आहे तर ह्युंदाई एक्स्टर सीएनजीची किंमत आठ लाख 43 हजार रुपये इतकी आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts