Reliance Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. ही कंपनी आपल्या करोडो ग्राहकांसाठी सातत्याने वेगवेगळे रिचार्ज प्लॅन लॉन्च करत असते. कंपनीचे अनेक स्वस्त आणि महाग रिचार्ज प्लॅन आहेत.
एक महिन्यापेक्षा कमी व्हॅलिडीटी असणारे तसेच दीर्घ कालावधीची व्हॅलिडीटी असणारे पॅक देखील कंपनीने लॉन्च केले आहेत.
दरम्यान आज आपण कंपनीचा असा एक रिचार्ज प्लॅन जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये महिन्याला फक्त दीडशे रुपये खर्च करून ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, इंटरनेट, SMS तसेच इतर अन्य बेनिफिट उपलब्ध होत आहेत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर माहिती.
कोणता आहे तो प्लॅन
आम्ही ज्या रिचार्ज प्लॅनबाबत बोलत आहोत तो आहे 395 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन. हा प्लॅन असा ग्राहकांसाठी फायदेशीर ठरतो ज्यांना लॉन्ग टर्म व्हॅलिडीटी हवी आहे.
या प्लॅनसोबत ग्राहकांना 84 दिवसांची व्हॅलिडीटी मिळते. या प्लॅनसोबत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि सहा जीबी डेटा मिळतो.
अर्थातच ज्यांना इंटरनेटसाठी प्लॅन खरेदी करायचा असेल त्यांच्यासाठी हा प्लॅन फायदेशीर ठरणार नाही. ज्यांच्याकडे घरी वायफाय बसवलेले असेल त्यांच्यासाठी मात्र हा प्लॅन फायद्याचा ठरणार आहे.
म्हणजे हा प्लॅन फक्त कॉलिंगसाठी बेनिफिशियल राहू शकतो. या प्लॅनची विशेषता म्हणजे यासोबत १००० एसएमएस मिळतात.
या प्लॅन सोबत दिला जाणारा 6 जीबी डेटा संपल्यानंतर ग्राहकांचा इंटरनेट स्पीड 64 केबीपीएस एवढा होणार आहे.
यामध्ये ग्राहकांना जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊड चे एक्सेस देखील मिळते. या प्लॅनचा दिवसाचा खर्च फक्त पाच रुपये एवढा आहे.
यामुळे जर कोणाला कमी किमतीत लॉंग टर्म व्हॅलिडीटीचा रिचार्ज प्लॅन हवा असेल तर त्यांच्यासाठी हा रिचार्ज फायद्याचा ठरणार आहे.