ऑटोमोबाईल

Renault Cars Discount: अरे वाह ! आता कार खरेदीवर होणार बंपर बचत; ‘ह्या’ कार्सवर मिळत आहे भन्नाट डिस्काउंट , पहा संपूर्ण ऑफर

Renault Cars Discount:  तुम्ही देखील तुमच्यासाठी नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असला तर आम्ही तुम्हाला सांगतो बाजारात तुमच्यासाठी एक भन्नाट आणि बेस्ट डिस्काउंट ऑफर जाहीर करण्यात आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही हजारो रुपयांची बचत करून नवीन कार खरेदी करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या भारतीय बाजारपेठेमध्ये लोकप्रिय कार कंपनी Renault ने ग्राहकांसाठी एक भन्नाट डिस्काउंट ऑफर जाहीर केला आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही आता एकापेक्षा एक कार्स अगदी स्वस्तात खरेदी करू शकतात. चला मग जाणून घेऊया या भन्नाट आणि बेस्ट डिस्काउंट ऑफरबद्दल संपूर्ण माहिती.

Renault ऑफर्स

आम्ही तुम्हाला सांगतो की मार्च 2023 मध्ये रेनॉल्टच्या छोट्या हॅचबॅक आणि Kwid या भारतातील बहुचर्चित कारवर सर्वाधिक 57 हजार रुपयांच्या ऑफर मिळत आहेत. कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कंपनी 2022 मध्ये बनवलेल्या Kwid वर 57,000 रुपयांच्या ऑफर देत आहे. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवर वेगवेगळ्या रोख सवलती दिल्या जात आहेत. कंपनी मॅन्युअल ट्रान्समिशनसह Kwid वर 20,000 रुपयांची रोख सूट देत आहे.

ऑटोमॅटिक Kwid च्या खरेदीवर 25,000 रुपयांची रोख सूट उपलब्ध आहे. कॉर्पोरेट डिस्काउंटसाठी 12 हजार रुपये आणि एक्सचेंज बेनिफिट म्हणून 20 हजार रुपये मिळू शकतात. Renault Kwid ची एक्स-शोरूम किंमत 4.70 लाख रुपयांपासून सुरू होते.

Renault Triber

आता आम्ही तुम्हाला सांगूया की रेनॉल्टच्या सर्वात कमी किमतीच्या सात सीटर कारपैकी एक, ट्रायबर देखील भारतीय बाजारपेठेत ऑफर करण्यात आली आहे. सात सीटर MPV ट्रायबरची एक्स-शोरूम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते.

कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कंपनी 2022 या वर्षात बनवलेल्या ट्रायबरवर 62,000 रुपयांच्या ऑफर देत आहे. यामध्ये काही व्हेरियंटवर 25 हजार रुपयांची रोख सूट दिली जात आहे. कॉर्पोरेट डिस्काउंटसाठी 12 हजार रुपये आणि एक्सचेंज बेनिफिट म्हणून 25 हजार रुपये मिळू शकतात.

हे पण वाचा :- AC Offers : नवीन एसी खरेदी करताना ‘ह्या’ चुका चुकूनही करू नका ! ‘या’ गोष्टींची घ्या विशेष काळजी नाहीतर ..

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts