भारतामध्ये अनेक बाईक उत्पादक कंपन्या असून त्या व्यतिरिक्त जागतिक स्तरावरील बाईक कंपन्यांच्या माध्यमातून देखील भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक वेगवेगळी वैशिष्ट्ये आणि किंमत असलेल्या बाईक लॉन्च केल्या जात आहेत. ग्राहकांच्या गरजा ओळखून त्याप्रमाणे बाईक कंपन्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या बाईक सादर केला जात आहे.
साधारणपणे जर आपण भारतीय बाईक बाजारपेठेचा विचार केला तर भारतीय ग्राहकांमध्ये ज्याप्रमाणे हिरो किंवा होंडा तसेच बजाज सारख्या कंपन्यांच्या बाईक प्रसिद्ध आहेत.
अगदी त्याचप्रमाणे रॉयल एनफिल्डच्या बाइक्स म्हणजेच बुलेट या गेल्या कित्येक वर्षापासून तरुणाईमध्ये असलेली क्रेझ टिकवून आहेत. त्यामुळे त्याचेच पुढचे पाऊल म्हणून रॉयल एनफिल्ड ने काल म्हणजे 17 जुलै रोजी नवीन रोडस्टर बाईक गोरिल्ला 450 लॉन्च केली व स्पेन मधील बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांमध्ये रॉयल एनफिल्डने भारत व इतर युरोपीय बाजारपेठेसाठी ती सादर केली.
काय आहेत रॉयल एनफिल्ड गोरील्ला 450 मध्ये फीचर्स?
रॉयल एनफिल्डने काल नवीन रोडस्टर बाईक गोरिल्ला 450 लॉन्च केली. या बाईकमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, गुगल मॅप्स इंटिग्रेशन आणि मीडिया कंट्रोलसह चार इंचाचा टीएफटी डिस्प्ले देण्यात आलेला असून ही बाईक तीन प्रकार आणि पाच रंग पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. साधारणपणे एक ऑगस्टपासून ही बाईक भारतीय शोरूममध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल अशी माहिती समोर आलेली आहे.
कसे आहे या बाईकचे इंजिन?
नवीन गोरील्ला 450 मध्ये 452cc लिक्विड कुल्ड सिंगल सिलेंडर शेर्पा इंजिन देण्यात आलेले आहे. हे इंजिन 8 हजार आरपीएम वर 40 एचपीची पावर आणि 5500 आरपीएम वर 40 एनएम टॉर्क जनरेट करते. यावेळेस रॉयल एनफिल्डच्या माध्यमातून कमी किंवा अधिक चांगले टॉर्क देण्याकरिता इंजिन पुन्हा ट्यून केलेले आहे.
टॉर्क बद्दल कंपनीचा दावा आहे की 85% पेक्षा जास्त टॉर्क तीन हजार आरपीएम पासून उपलब्ध आहे. तसेच या बाईकमध्ये असिस्ट आणि स्लिप क्लचसह इंजिन सहा स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तसेच या बाईकमध्ये दोन राईड मोड देण्यात आलेले आहेत व त्यापैकी एक परफॉर्मन्स मोड आणि दुसरा इको मोड आहे.
भारतीय बाजारपेठेत किती आहे या बाईकची किंमत?
रॉयल एनफिल्ड नवीन रोडस्टर गोरिल्ला 450 ची भारतीय बाजारपेठेतील एक्स शोरूम किंमत दोन लाख 39 हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे. तर टॉप वेरियंटमध्ये ही किंमत 2 लाख 54 हजार रुपये एक्स शोरूम पर्यंत जाते.