Royal Enfield : संपूर्ण देशभरात रॉयल एनफील्डच्या बाईक्स खूप लोकप्रिय आहेत. या कंपनीच्या बाईक्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कंपनीही बाईक्समध्ये वेळोवेळी नवनवीन अपडेट्स आणत असते. काही दिवसापूर्वी कंपनीने हंटर 350 ही बाईक लाँच केली होती.
लाँचनंतर या बाईकने मार्केटमधील इतर बाईक्सना कडवी टक्कर दिल्याचे पाहायला मिळाले. जर तुम्हीही ही बाईक खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आता एक धक्कादायक बातमी आहे. कारण या बाइक्सच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. पहा यादी
दरम्यान Royal Enfield ने Hunter 350 Retro आणि Metro या दोन ट्रिममध्ये सादर केले आहे, जे तीन प्रकारांमध्ये येतात. किमतीचा विचार केला तर हंटर 350 ची किंमत आता रु. 1.49 लाख ते रु. 1.75 लाख (एक्स-शोरूम) इतकी आहे. सध्या कंपनीने बाईकच्या बेस व्हेरिएंटच्या किंमतीत कोणतीही वाढ केली नसली तरी ती पूर्वीप्रमाणेच 1.49 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करता येत आहे. परंतु इतर प्रकार महाग झाले आहेत.
हंटर 350 प्रकार आणि किमती:
प्रकार | नवीन किंमत (एक्स-शोरूम) |
रेट्रो हंटर फॅक्टरी सीरीज | 1,49,900 रुपये |
मेट्रो हंटर डॅपर सीरीज | 1,69,656 रुपये |
मेट्रो हंटर रेबल सीरीज | 1,74,655 रुपये |
हंटर 350 तीन प्रकारात सादर
कंपनीची Hunter 350 तीन प्रकारांमध्ये सादर केली आहे, ज्यात फॅक्टरी (ब्लॅक आणि सिल्व्हर), डॅपर (ग्रे, अॅश आणि व्हाइट) तसेच रिबेल (रेड, ब्लॅक आणि ब्लू) या तीन व्हेरियंटचा समावेश आहे. या बाईकमध्ये, कंपनीकडून 349cc क्षमतेचे एअर-कूल्ड सिंगल-सिलेंडर काउंटर संतुलित इंजिन वापरण्यात आले आहे, जे क्लासिक 350 आणि मेटियर 350 मध्ये देण्यात आले आहे.
हे इंजिन 20.1PS पॉवर आणि 27Nm टॉर्क जनरेट करेल, ते 5-स्पीड गिअरबॉक्ससह जोडण्यात आलेले आहे. ही बाईक 13-लीटर इंधन टाकीसह येत असून जी साधारणपणे 40 किमी/ली पर्यंत मायलेज देते.
कंपनीने हंटर 350 ला रेट्रो-शैलीतील अर्ध-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोलने सुसज्ज केले आहे, ज्याला ट्रिपर पॉड (स्मार्टफोन-कनेक्टिव्हिटी टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन असिस्ट) चा पर्याय दिला जात आहे. बेस फॅक्टरी व्हेरियंटला ओडोमीटर, फ्युएल गेज, दोन ट्रिप मीटर आणि मेंटेनन्स इंडिकेटरसह लहान डिजिटल इनसेट मिळत आहे.
तर मिड-स्पेक आणि हाय-एंड व्हेरियंटला मोठा डिजिटल इनसेट दिला जात आहे.या बाईकला दोन्ही बाजूला रेट्रो-स्टाईल रोटरी स्विच क्यूब्स मिळतात, डाव्या स्विच क्यूबला यूएसबी पोर्ट (मिड-स्पेक आणि हाय-एंड प्रकारांवर) मिळतो. तसेच बेस व्हेरिएंट USB पोर्टशिवाय पारंपारिक स्विचगियरसह येतो.