Tata Cars : सध्या टाटा आपल्या अनेक कार्सवर डिस्काऊंट ऑफर करत आहे. कपंनी सध्या आपल्या जुन्या स्टॉकवर आकर्षक सूट देत आहे. जुना स्टॉक क्लिअर करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे, टाटा आपल्या अनेक गाड्यांवर 1.33 लाख रुपयांपर्यंतची सूट देत आहे. अशातच जर तुमचा सध्या गाडी घेण्याचा बेत असेल तर तुमच्यासाठी ही संधी एकदम उत्तम आहे.
कपंनी आपला जुना स्टॉक संपवण्यासाठी, ही सूट देत आहे. कपंनी आपल्या Tiago पेट्रोल व्हेरियंटवर 90,000 हजार रुपयांची सूट (Tata Car discount) देत आहे. तर Tigor वर तुम्ही 85,000 रुपये (Tata tiago किंमत) पर्यंत बचत करू शकता. याशिवाय प्रीमियम हॅचबॅक कार Altroz रेंजवर 70,000 रुपये वाचवण्याची संधी आहे.
तर तुम्हाला कॉम्पॅक्ट SUV Nexon रेंजवर 95,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. Harrier वर, तुम्हाला 1.33 लाख रुपये (Tata Nexon price) ची कमाल सूट दिली जात आहे. याशिवाय सफारीवर १.३३ लाख रुपयांपर्यंत सूट मिळेल.
नवीन स्टॉकवर किती पर्यंत सूट मिळेल?
Tata Motors नवीन स्टॉकवर (MY 2024) खूप कमी सूट देत आहे. कंपनीच्या Tiago, Tigor, Altroz, Nexon Harrier Safri वर तुम्हाला Rs 25,000 (tata tigor किंमत) पासून 60,000 पर्यंत सूट मिळेल. अशा परिस्थितीत जुना स्टॉक खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते.
जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर जुना स्टॉक तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. कारण नवीन मॉडेलवर कोणतीही विशेष सूट उपलब्ध नाही. दरम्यान कपंनी उद्या म्हणजेच ७ जून रोजी टाटा आपली नवीन अल्ट्रोज रेसर (टाटा कार) लाँच करणार आहे. कंपनीने ही कार अशा लोकांसाठी डिझाइन केली आहे ज्यांना फन ड्राईव्ह आवडते.