ऑटोमोबाईल

8 ते 10 लाखाच्या बजेटमध्ये कार खरेदी करायची का? 2024 मध्ये लॉन्च झालेल्या ‘या’ कार ठरतील बेस्ट ऑप्शन; मिळतात भन्नाट फीचर्स

Best Car In 2024:- भारतीय कार बाजारपेठेच्या दृष्टिकोनातून 2024 हे वर्ष खूप महत्त्वपूर्ण असल्याचे आपल्याला दिसून आले. 2024 या वर्षांमध्ये अनेक कंपन्यांनी उत्कृष्ट अशी फीचर्स असलेली बजेट सेगमेंट मधील अनेक कार लॉन्च केलीत व लॉन्च करण्यात आलेल्या या बजेट कारमुळे अनेक लोकांना कार घेण्याचे स्वप्न देखील पूर्ण करता येणे शक्य झाले.

या वर्षांमध्ये अनेक लोकप्रिय असलेल्या वाहन उत्पादक कंपन्यांनी वैशिष्ट्यपूर्ण अशा कार लॉन्च केल्यामुळे हे वर्ष भारतीय वाहन बाजारपेठेसाठी खूप दिलासादायक ठरल्याचे दिसून आले.

त्यामुळे तुम्हाला देखील जर उत्कृष्ट फीचर्स आणि आठ ते दहा लाखाच्या बजेटमध्ये कार खरेदी करायची असेल तर आपण काही कारची माहिती या लेखात घेणार आहोत, जी कार खरेदी करण्याअगोदर तुम्हाला नक्कीच फायद्याचे ठरेल.

आठ ते दहा लाखाच्या बजेटमधील या कार आहेत उत्तम

1- होंडा अमेझ- होंडा कार्स इंडिया एक लोकप्रिय अशी कार उत्पादक कंपनी असून या कंपनीने सेडान अमेझचे थर्ड जनरेशन मॉडेल लॉन्च केले असून ही कार होंडा अमेझ व्ही, होंडा अमेझ व्हीएक्स आणि होंडा अमेझ झेड एक्स अशा तीन वेरियंट व एकूण सहा रंगांमध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे.

होंडा अमेझमध्ये अडॅप्टीव्ह क्रूज कंट्रोल, रोड डिपार्चर मीटीगेशन, लेनकीप असिस्ट, कोलिजन मिटीगेशन ब्रेकिंग सिस्टम, हाऊ टू हाय बीम व लीड कार्ड पार्चर नोटिफिकेशन सिस्टम, सेगमेंट फर्स्ट लेनवॉच कॅमेरा, सहा एअर बॅग्स, हिल स्टार्ट असिस्ट, व्हेईकल स्टॅबिलिटी असिस्ट, रियर पार्किंग सेन्सर्स, मल्टी अँगल रियर पार्किंग कॅमेरा,

अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन व इमर्जन्सी स्टॉप सिग्नल असे फीचर्स देण्यात आले असून या कारची किंमत आठ लाखापासून ते दहा लाख 90 हजार रुपयापर्यंत आहे.

2- स्कोडा कायलाक- भारतीय बाजारपेठेमध्ये स्कोडा इंडिया या प्रसिद्ध कार उत्पादक कंपनीने स्कोडा कायलाक लॉन्च केली व तिची सुरुवातीची किंमत सात लाख 89 हजार रुपये एक्स शोरूम इतके आहे. विशेष म्हणजे स्कोडाच्या या कारला फाइव स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेली असून या कारमध्ये 25 पेक्षा जास्त सुरक्षा फीचर्स देण्यात आली आहेत.

इलेक्ट्रिक सनरूफ, 446 लिटर बूट स्पेस, 17 इंच ड्युअल टोन अलोय व्हील, दहा इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, आठ इंच ड्रायव्हर डिस्प्ले, सिंगल पॅनल सनरूफ तसेच एक वायरलेस फोन चार्जर व व्हेंटिलेटेड फ्रंट सीट आणि फ्रंटच्या दोन्ही सीट तुम्ही सहा पद्धतीने इलेक्ट्रिकल ॲडजस्ट करू शकतात.

स्कोडा लाइन अप मधील सर्वात परवडणारी कार म्हणून कायलाक ओळखली जाते व ही सध्या पेट्रोल व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये एक लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले असून ते मॅन्युअल, एएमटी ट्रान्समिशन पर्याय मध्ये उपलब्ध आहे.

3- नवीन जनरेशन मारुती डिझायर 2024- मागच्या महिन्यामध्ये मारुती सुझुकी या प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनीच्या माध्यमातून कॉम्पॅक्ट सेडान कार सेगमेंटमध्ये नवीन जनरेशन मारुती डिझायर 2024 लॉन्च केली. या कारमध्ये नऊ इंची इन्फोटेनमेंट सिस्टीम, अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले, 16 इंच अलॉय व्हील,

एलइडी डीआरएल, एलईडी लाइट्स, एलईडी फॉग लॅम्प, बॉडी कलर बंपर, हाय माउंट एलईडी स्टॉप लॅम्प, लेदर रॅप स्टेरिंग देण्यात आली आहे. याशिवाय शार्क फिन अँटेना, फ्रंट फुटवेल एलिमिनेशन व्हील टोन इंटिरियर, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, 360 डिग्री व्ह्यू कॅमेरा, टीपीएमएस, सनरूफ, क्रुझ कंट्रोल वायरलेस चार्जर सारखे अनेक वैशिष्ट्ये देण्यात आले आहेत.

या कारची किंमत बघितली तर ती सहा लाख 79 हजार ते दहा लाख 14 हजार रुपये पर्यंत जाते. तसेच मारुतीच्या या नवीन डिझायर 2024 मध्ये सीएनजी प्रकार देखील असून त्याची एक्स शोरूम किंमत आठ लाख 74 हजार ते नऊ लाख 74 हजार रुपये पर्यंत आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts