ऑटोमोबाईल

Skoda Cars : सगळ्यांची बोलती बंद करायला स्कोडाच्या ‘या’ तीन SUV लवकरच उतरणार मैदानात!

Skoda Cars : येत्या काही महिन्यांत तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आगामी काळात स्कोडा कपंनीच्या काही कार मार्केटमध्ये लॉन्च होतील. कपंनी सध्या तीन नवीन एसयूव्ही लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. चला कंपनीच्या आगामी वाहनांबद्दल जाणून घेऊया.

Skoda Compact SUV

गेल्या काही वर्षांत भारतीय ग्राहकांमध्ये कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. टाटा नेक्सॉन, टाटा पंच आणि मारुती ब्रेझा यांनी या सेगमेंटमध्ये बंपर विक्री नोंदवली आहे. आता स्कोडाही या सेगमेंटमध्ये उतरणार आहे. Skoda च्या आगामी कॉम्पॅक्ट SUV मध्ये 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते.

Skoda Slavia Facelift

गेल्या काही महिन्यांत स्कोडा स्लाव्हिया ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. आता कंपनी येत्या काही महिन्यांत स्कोडा स्लाव्हियाचे अपडेटेड व्हर्जन लॉन्च करणार आहे. अपडेटेड स्कोडा स्लाव्हियामध्ये ग्राहकांना लेव्हल-2 एडीएएस आणि 360 डिग्री कॅमेरा मिळू शकतो. फेब्रुवारी 2024 मध्ये स्कोडा स्लाव्हिया 1,242 युनिट्सची विक्री करून कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार बनली.

Skoda Kushaq Facelift

Skoda Kushaq ही कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. गेल्या महिन्यात स्कोडा कुशाक कारच्या 1,082 युनिट्सची विक्री करून दुसऱ्या स्थानावर आहे. आता कंपनी Skoda Kushaq चे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्कोडा कुशाक पुढील काही महिन्यांत लॉन्च होणार आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts