Xiaomi : मोबाईल कंपनी Xiaomi आता ऑटो मार्केटमध्ये घुसणार असल्याचे पाहायला मिळत आहे. मोबाईल मार्केटमध्ये स्पर्धा निर्माण केल्यानंतर कंपनी आता ऑटो मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार असलयाचे चित्र आहे. सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत असतानाच चीनी टेक कंपनी Xiaomi आपली पहिली कार SU7 लवकर लॉन्च करणार असल्याचे बोलले जात आहे.
चीनी टेक कंपनी Xiaomi ची पहिली इलेक्ट्रिक कार SU7 ची डिलिव्हरी या महिन्यात सुरू होणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तानुसार, Xiaomi च्या पहिल्या ईव्हीची डिलिव्हरी 28 मार्चपासून सुरू होणार आहे. यासाठी Xiaomi ने चीनच्या 29 शहरांमध्ये 59 स्टोअर उघडले आहेत. तसेच, SU7 ची किंमत देखील त्याच दिवशी घोषित केली जाऊ शकते.
Xiaomi ही एक स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जिने केवळ भारतच नाही तर जगभरातील अनेक देशांतील तरुणांना आकर्षित केले आहे. सेल फोन, गृहोपयोगी उपकरणे आणि इलेक्ट्रिकल उपकरणांसोबतच कंपनी आता इलेक्ट्रिक वाहनांमध्ये देखील आपली छाप सोडण्यासाठी सज्ज झाली आहे.
तुमच्या माहितीसाठी सध्या ही कार फक्त चीनमध्ये लॉन्च केली जाईल. त्यानंतर ते जगातील इतर देशांना विकले जाईल. भारतातही येण्याची अपेक्षा आहे. मात्र, यासंदर्भात कंपनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
चीनची BYD भारतात प्रीमियम इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत झेंडा फडकवत आहे. त्यामुळे Xiaomi ची ही इलेक्ट्रिक कार देखील लवकरच भारतीय बाजारात दाखल होईल असे मानले जात आहे.
Xiaomi SU7 इलेक्ट्रिक कारची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. कंपनी येत्या 28 तारखेला Xiaomi SU7 कारशी संबंधित सर्व माहिती स्पष्ट करेल.
दरम्यान, Xiaomi S7 इलेक्ट्रिक कार बाजारात आल्यावर Tesla आणि BYD च्या फ्लॅगशिप मॉडेल्सची प्रमुख प्रतिस्पर्धी असेल. SU7 ची रचना ई-कार म्हणून केली गेली आहे ज्यात अनेक वैशिष्ट्ये आहेत जी त्यांच्याशी स्पर्धा करतील.