ऑटोमोबाईल

Sonalika RX 55 DLX Tractor: सोनालिकाचे ‘हे’ 55 HP ट्रॅक्टर कमी डिझेलमध्ये शेतीत करते भरपूर काम! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Sonalika RX 55 DLX Tractor:- ट्रॅक्टरचा वापर आता शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीत करतात व शेतीतील अनेक अवजड कामे जसे की शेतीची पूर्व मशागत असो की शेतीची आंतरमशागतीची कामे याकरिता ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करण्याअगोदर तो जास्त एचपीचा व मायलेज उत्तम असलेला व परवडेल अशा किमतीमध्ये मिळेल अशा ट्रॅक्टरच्या शोधात असतात. तसे पाहायला गेले तर भारतामध्ये अनेक कंपन्यांची ट्रॅक्टर आहेत.

परंतु यामध्ये सोनालिका  कंपनीचे अनेक ट्रॅक्टर असून ते शेतीसाठी उत्तम ठरू शकतात. सोनालिकाच्या ट्रॅक्टरमध्ये जर आपण सोनालिका  RX 55 DLX या ट्रॅक्टरचा विचार केला तर हा शेतीकामासाठी उत्तम असा पर्याय असून कमीत कमी डिझेलमध्ये जास्तीत जास्त काम करण्याची क्षमता या ट्रॅक्टरमध्ये आहे.

 काय आहेत सोनालिका RX 55 DLX ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये?

सोनालिकाच्या या ट्रॅक्टरमध्ये पॉवर स्टेरिंग देण्यात आलेली असून यामुळे शेतात कुठलेही काम अगदी सहजपणे आणि सुरळीतपणे करता येणे शक्य होते व योग्य ड्राईव्ह करण्यास या स्टेरिंगमुळे मदत मिळते. कंपनीच्या माध्यमातून या ट्रॅक्टरला आठ फॉरवर्ड + दोन रिवर्स गिअर्ससह गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

तसेच या ट्रॅक्टरमध्ये डुएल क्लच देण्यात आला असून तो साईड शिफ्ट प्रकारच्या ट्रान्समिशनसह कॉस्टंट मेशसह येतो. तसेच या ट्रॅक्टरला ऑइल इमर्स ब्रेक देण्यात आलेले असून ट्रॅक्टरवर मजबूत पकड ठेवण्यासाठी ते सक्षम आहेत.

 कसे आहे या ट्रॅक्टरचे इंजिन?

सोनालिकाच्या या ट्रॅक्टरमध्ये चार सिलेंडर वॉटर कुल्ड इंजिन देण्यात आलेले आहे. जे 55 एचपी पावर जनरेट करते. तसेच कंपनीच्या या ट्रॅक्टरला प्री क्लिनर एअर फिल्टरसह ऑइल बाथ/ ड्राय टाईप देण्यात आला आहे. या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 47 एचपी आहे व त्याचे इंजन 2000 आरपीएम जनरेट करते.

सोनालिकाच्या या ट्रॅक्टरची हायड्रोलिक क्षमता दोन हजार किलोग्राम ठेवण्यात आली असून 65 लिटर क्षमतेची इंधन टाकी देण्यात आली आहे. सोनालिका कंपनीने हा 55 एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर मजबूत व्हीलबेससह तयार केला आहे.

 किती आहे सोनालिका RX 55 DLX ट्रॅक्टरची किंमत?

सोनालिकाच्या या ट्रॅक्टरची भारतातील एक्स शोरूम किंमत आठ लाख 43 हजार ते आठ लाख 95 हजार रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत आरटीओ नोंदणी आणि रोड टॅक्समुळे काही राज्यांमध्ये बदलू शकते. तसेच या सोबत कंपनी तिच्या सोनालिका RX 55 DLX ट्रॅक्टर सह पाच वर्षाची वारंटी देखील देते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts