Sonalika Tractor:- शेतीतील अवघडातले अवघड कामे करण्यासाठी ट्रॅक्टर हे यंत्र खूप महत्त्वाचे असून शेतीतील प्रत्येक कामांसाठी ट्रॅक्टरचा आता मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. तसेच अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर सध्या बाजारपेठेत उपलब्ध असून प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि किंमत देखील वेगवेगळे आहेत.
शेतकरी हे त्यांच्या गरजेनुसार आणि आर्थिक बजेट पाहून ट्रॅक्टरची खरेदी करत असतात. परंतु तरीदेखील ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये जे काही उत्कृष्ट ब्रँड आहेत त्याच कंपन्यांचे ट्रॅक्टर खरेदी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आपल्याला दिसून येतो. अशा उत्कृष्ट कंपन्यांमध्ये सोनालीका ट्रॅक्टर हे नाव देखील देशात आघाडीवर आहे.
आजपर्यंत सोनालिका कंपनीने अनेक ट्रॅक्टर्स मॉडेल बाजारपेठेत आणलेले आहेत व त्याचाच भाग म्हणून सोनालीका ट्रॅक्टर च्या माध्यमातून ‘एक देश, एक किंमत’ अशा पद्धतीचा एक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे व त्या उपक्रमांतर्गतच आता सोनालिका ट्रॅक्टरने सिकंदर डीएलएक्स डीआय 60 हा ट्रॅक्टर ब्रँड लॉन्च केलेला आहे. याच ट्रॅक्टरची माहिती या लेखात घेऊ.
सोनालिकाच्या या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
सोनालिका कंपनीचा सिकंदर डीएलक्स डीआय 60 हा एक शक्तिशाली ट्रॅक्टर असून त्याची क्षमता ही 4709 सीसी असून तो चार सिलेंडरमध्ये उपलब्ध आहे. हा ट्रॅक्टर 275 एनएम टॉर्क निर्माण करतो. तसेच या ट्रॅक्टरला फॉरवर्ड बारा आणि रिव्हर्स 12 गिअर्स देण्यात आलेल्या आहेत याला कंपनीच्या माध्यमातून 5G हायड्रोलिक्स सुविधा देखील देण्यात आलेली आहे.
या ट्रॅक्टरची हायड्रोलिक पावर म्हणजेच वजन उचलण्याची क्षमता ही 2200 किलोग्रॅम आहे. या ट्रॅक्टरला अतिरिक्त वैशिष्ट्य देताना यामध्ये एलईडी डीआरएल हेडलाईट, लेड टेल लाईट, प्रो+ बंपर, आरामदायी सीट आणि पावर स्टेरिंग देण्यात आलेली आहे. हे एक मल्टी स्पीड ट्रॅक्टर असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी शेतीतील कामे करण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
सोनालिका कंपनीने सुरू केलेले एक देश, एक किंमत या उपक्रमांतर्गत लॉन्च केलेले हे ट्रॅक्टर ट्रॅक्टर उद्योगांमध्ये क्रांती घडवून आणेल हे मात्र निश्चित. यामध्ये 12 फॉरवर्ड तसेच 12 रिव्हर्स गिअर्स देण्यात आलेले आहेत तसेच अत्याधुनिक अशी हायड्रोलिक सिस्टम देखील देण्यात आलेली असल्याने हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा ठरेल.
किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?
सोनालिका ट्रॅक्टरच्या एक देश, एक किंमत उपक्रमांतर्गत लॉन्च करण्यात आलेल्या सोनालिकाच्या सिकंदर डीएलक्स डीआय 60 या ट्रॅक्टरची किंमत 8 लाख 49 हजार 999 रुपये इतकी निर्धारित करण्यात आलेली आहे.