ऑटोमोबाईल

Car Loan Tips: ‘या’ गोष्टींकडे लक्ष द्या तरच कार लोनच्या फंदात पडा! नाहीतर फायदा राहील दूरच परंतु नुकसानच होईल अधिक

Car Loan Tips:- प्रत्येकाला वाटते की आपल्या घरासमोर कार असावी आणि आपण देखील इतर व्यक्तींप्रमाणे मस्तपैकी कारमध्ये फिरावे अशा प्रकारचे स्वप्न बऱ्याच जणांचे असते. एवढंच नाही तर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बरेच जण विविध मार्गाने प्रयत्न देखील करतात.

या प्रयत्नांचाच भाग म्हणून आपण कार लोनचा विचार करू शकतो. कारण आता अनेक फायनान्स कंपनी आणि बँकांच्या माध्यमातून कार लोनची प्रक्रिया सहज आणि सोपी करण्यात आली असल्यामुळे काही सोप्या गोष्टींची पूर्तता केली तरी तुम्हाला पटकन कर्ज मिळते व कार घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येते.

परंतु कर्ज घेतले म्हणजे त्याची परतफेड करणे हे गरजेचे असते व या कर्जाची परतफेड आपल्याला करावीच लागते. त्यामुळे आपल्यावर या कर्जाच्या हप्त्यांच्या मोठ्या प्रमाणावर बोजा पडतो. त्यामुळे तुम्हाला देखील जर कार लोन घ्यायचे असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते.

नाहीतर ग्राहकांकडून अशा काही चुका होऊन जातात की त्या पुढे त्रासाचे कारण बनू शकतात. त्यामुळे कार लोन किंवा कोणत्याही वाहनावर जरी तुम्हाला कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. याविषयीची माहिती या लेखात बघू.

 कार/ वाहन लोन घेताना या गोष्टींची घ्या काळजी

1- सिबिल स्कोरवर लक्ष द्या तुम्ही कोणत्याही प्रकारचे जेव्हा कर्ज घेतात तेव्हा सगळ्यात अगोदर तुमचा क्रेडिट स्कोर अर्थात सिबिल स्कोर हा बँका कडून पाहिला जातो. तुमचा सिबिल स्कोर जर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज हे कमी व्याजदरामध्ये मिळते.

या उलट तुमचा सिबिल घसरलेला असेल तर तुम्हाला कर्ज घेताना ते जास्त व्याजदराने मिळते किंवा कर्ज मिळू शकत नाही. तुमचा क्रेडिट स्कोर खराब असेल तर घेतलेल्या कर्जाची वेळेवर परतफेड करणे खूप महत्त्वाचे आहे.

2- कर्जाच्या व्याजदर किती हे पहा?- बऱ्याचदा आपण कर्ज घेतो परंतु त्या कर्जावर किती व्याजदर आकारला जाणार आहे हे आपण बघत नाही. व्याजदराचा सगळ्यात मोठा प्रभाव हा तुमच्या कर्ज परतफेडवर पडत असतो.

त्यामुळे तुम्हाला वाहन कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही एकापेक्षा जास्त बँकांच्या व्याजदराची  तुलना करणे गरजेचे आहे व ज्या ठिकाणी तुम्हाला कमी व्याज दराने कर्ज मिळेल त्या ठिकाणाहून तुम्ही कर्ज घेणे गरजेचे आहे.

3- डाऊन पेमेंटचा विचार करा जेव्हाही तुम्ही कर्ज घेऊन वाहन किंवा कार घ्याल तेव्हा त्याआधी तुम्ही डाऊन पेमेंट करणे खूप गरजेचे आहे. तुम्ही जर डाऊन पेमेंट केले नाही

तर तुम्हाला बऱ्याच काळापर्यंत कर्ज परतफेड करावी लागू शकतो. यासोबतच परतफेड केलेल्या ईएमआय वरील व्याजही अनेक पटीने वाढते व काही छुपे शुल्क देखील आकारले जाते.

4- कारचे बजेट पाहावे तुम्हाला कोणती कार घ्यायची आहे हे आधी ठरवणे खूप गरजेचे आहे. परंतु तुम्हाला किती रुपयांचे कर्ज मिळते यावर तुमच्या कारचा निर्णय अवलंबून असू नये. यामध्ये तुम्ही तुमचे बजेट आणि आवश्यक खर्चाचा विचार करूनच कारची निवड करणे गरजेचे आहे.

जर तुम्ही असे केले तर तुम्हाला सहजपणे कार लोन मिळेल आणि भविष्यात देखील कर्ज फेडण्याचे जास्त टेन्शन राहणार नाही. कारण तुम्ही तुमच्या खर्चाचा विचार करूनच ईएमआय ठरवलेला असणार. त्यामुळे तुमच्या कार लोनचा ईएमआय हा तुमच्या पगाराच्या दहा टक्क्यांपेक्षा जास्त असू नये.

5- एलिजिबिलिटी आणि ऑफर एलजीबिलिटी म्हणजे बँक लोनसाठीचा क्रायटेरिया तपासणे हे होय. तुम्ही कार लोन साठी पात्र आहात का हे तपासणे खूप गरजेचे आहे. तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्यासाठी बँकेने सांगितलेले जे काही निकष आहेत त्यामध्ये बसता की नाही हे तपासणे  यामध्ये येते.

जर आपण भारतातील काही बँकांचा विचार केला तर अनेक बँका या तुमच्या पात्रता आणि मॉडेलवर अवलंबून कार कर्जासाठी अनेक ऑफर देतात. तसेच तुमचे सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर तुम्हाला बँकांच्या माध्यमातून चांगल्यात चांगल्या डील्स देण्यात येतात. त्यामुळे या गोष्टींवर देखील लक्ष देणे खूप गरजेचे आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts