Hero New Bikes : गेल्या काही वर्षांत भारतीय ऑटो सेक्टरमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक बाइक्स आता भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात स्पॉट होत आहेत. विविध कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीवर फोकस करत आहे. मात्र असे असले तरी आजही देशात पेट्रोल स्कूटर आणि बाईक्सचा जलवा आहे.
अनेकांना पेट्रोलवर चालणारी स्कूटर आणि बाईक आवडते. जर तुम्हीही पेट्रोलवर चालणारी स्कूटर किंवा बाईक खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिरो कंपनी लवकरच नवीन स्कूटर आणि बाईक लॉन्च करणार आहे. कंपनीच्या माध्यमातून 3 नवीन वाहने लॉन्च केली जाणार आहेत. यामध्ये एक स्कूटर आणि दोन मोटरसायकलचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, आता आपण हिरो कंपनीच्या या अपकमिंग बाईक्स आणि स्कूटरबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Hero Xoom 160 : हिरो मोटोकॉर्पची पहिली ऍडव्हेंचर स्कूटर Xoom 160 यावर्षी भारतात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचा दावा व्हिडिओ रिपोर्ट मध्ये केला जात आहे. या नव्याने लॉन्च होणाऱ्या स्कूटरमध्ये i3S तंत्रज्ञानासह नवीन 156cc सिंगल सिलेंडर इंजिन आहे. याशिवाय, स्कूटरमध्ये पुढील आणि मागील डिस्क ब्रेक आणि 14-इंचाचे अलॉय व्हील आहेत.
हिरो मॅव्हरिक 440 : Hero Maverick 440 Harley Davidson X440 वर आधारित राहणार आहे. हिरोची आगामी बाईक 27bhp पॉवर आणि 36Nm टॉर्क जनरेट करणाऱ्या 440 cc ऑइल-कूल्ड इंजिनसह सुसज्ज आहे. आगामी बाईकच्या किमती पुढील महिन्यात जाहीर केल्या जातील आणि त्यानंतर त्याची डिलिव्हरी सुरू होईल.
हिरो करिझ्मा सीई : Hero MotoCorp ही देशातील एक नामांकित ऑटो कंपनी आहे. या कंपनीची बहुप्रतिक्षित आगामी Karizma CE सध्या फक्त 100 युनिट्समध्ये उपलब्ध आहे. हिरोची ही सेमी-फेअर मोटरसायकल जुलैमध्ये विक्रीसाठी ठेवली जाणार आहे.