Good News : एसएआर ग्रुपचा विजेवर चालणाऱ्या गाड्यांचा ब्रँड लेक्ट्रिक्स ईव्हीने त्यांच्या वेबसाईटवर एक अतिशय अनोखे इन्स्टंट लोन एलिजिबिलिटी टूल सुरू केले आहे,
ज्याच्या साहाय्याने कोणत्याही दुचाकीसाठी कर्ज पात्रता अगदी लगेच तपासता आणि कर्ज घेणे सोपे होणार आहे. भारतात जास्तीत जास्त लोकांनी विजेवर चालणारी वाहने स्वीकारावीत, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करवून देण्याच्या उद्देशाने, हे टूल ग्राहकांच्या वेळेची बचत व्हावी,
चिंता कमी व्हावी व त्यांना खरेदीचा निर्णय तातडीने घेता यावा या दृष्टीने डिझाईन करण्यात आले आहे. यासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांपैकी एक, आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या सहयोगाने प्रस्तुत करण्यात आलेले लेक्ट्रिक्सईव्ही डॉटकॉमवरील फ्री इन्स्टंट लोन एलिजिबिलिटी कॅल्क्युलेटर विडजेट ग्राहकांना त्यांचा सिबिल स्कोर फक्त ३ सहजसोप्या टप्प्यांमध्ये समजून घेण्यात मदत करेल.
याबाबत एसएआर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे एमडी आणि सीईओ के. विजय कुमार म्हणाले की, आम्ही असे मानतो की, प्रत्येक व्यक्तीला ईव्ही स्कूटर अगदी सहज विकत घेता आली पाहिजे. भारतातील ईव्ही बाजारपेठेत प्रचंड क्षमता उपलब्ध आहेत.
सध्या भारतात दुचाकी विभागात ईव्हीचे प्रमाण फक्त जवळपास ५० टक्के आहे, जे व्हिएतनाम आणि इंडोनेशिया सारख्या देशांपेक्षादेखील कमी आहे, या देशांमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांकडे दुचाकी आहे. २०३० सालापर्यंत उत्सर्जनाचे प्रमाण ४५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे आणि यामध्ये विजेवर चालणाऱ्या वाहनांचे योगदान खूप मोठे असणार आहे.