Tata And Mahindra SUV Price : नजीकच्या भविष्यात कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे टाटा आणि महिंद्रा मोटर्स या दोन आघाडीच्या कंपनीने आपल्या काही SUV च्या किमती मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत. त्यामुळे जर तुम्हीही येत्या काही दिवसात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमचे हजारो, लाखो रुपये वाचणार आहेत.
टाटा आणि महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने मंगळवारी या डिस्काउंट ऑफरची घोषणा केली आहे. टाटा मोटर्सने नुकताच 20 लाख SUV विक्रीचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. नक्कीच कंपनीसाठी हा एक मोठा माईलस्टोन आहे.
त्याचमुळे टाटा मोटर्सने आपल्या काही लोकप्रिय SUV च्या किमतीत मोठी कपात केली आहे. दरम्यान, आता आपण टाटा मोटर्सने अन महिंद्रा अँड महिंद्राने कोणत्या एसयूव्हीच्या किमती कमी केल्या आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
टाटा मोटर्सने कोणत्या एसयूव्हीच्या किंमती कमी केल्यात
टाटा मोटर्स ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. या कंपनीच्या वाहनांवर ग्राहकांचा मोठा गाढा विश्वास आहे. कंपनीच्या माध्यमातून विविध सेगमेंट मध्ये शेकडो मॉडेल लॉन्च करण्यात आले आहेत.
एसयुव्ही सेगमेंट मध्ये देखील टाटा कंपनीचे एक मोठे वर्चस्व पाहायला मिळते. एस यु व्ही सेगमेंट मध्ये टाटा कंपनीने आतापर्यंत वीस लाख वाहनांची विक्री केली आहे. याच आनंदाच्या पर्वावर टाटा कंपनीच्या माध्यमातून आपल्या काही लोकप्रिय वाहनांवर आता डिस्काउंटही ऑफर केला जात आहे.
कंपनीच्या माध्यमातून आपल्या लोकप्रिय हॅरीयर अन सफारी या SUV वर एक लाख 40 हजार रुपयांची सवलत दिली जात आहे. टाटा मोटर्स कंपनीकडून इलेक्ट्रिक सेगमेंट मधील SUV कार वर देखील डिस्काउंट ऑफर केला जात आहे.
या श्रेणीतील नेक्सॉन-ईव्हीवर १.३० लाख रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे. याशिवाय, टाटाने अलीकडेच लॉन्च केलेल्या पंच-ईव्ही या SUV वर ३०,००० पर्यंतचा डिस्काउंट ऑफर केला जात आहे. निश्चितच या डिस्काउंट ऑफरमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महिंद्रा अँड महिंद्राच्या कोणत्या SUV वर मिळतोय डिस्काउंट
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी देखील आपल्या एका लोकप्रिय गाडीवर लाखो रुपयांचा डिस्काउंट देत आहे. XUV 700 या SUV कारवर कंपनीकडून मोठा डिस्काउंट दिला जात आहे.
आधी ही गाडी 21.54 लाख रुपयांना बाजारात उपलब्ध होती. मात्र सध्या ही गाडी 19.49 लाख रुपयांना बाजारात उपलब्ध होत आहे. XUV 700 या गाडीचे दोन लाख युनिट नुकतेच सेल झाले आहेत.
याच निमित्ताने कंपनीकडून या गाडीवर भन्नाट ऑफर दिली जात आहे. पण, ही ऑफर काही लिमिटेड कालावधीसाठीच राहणार आहे. 10 जुलैपासून पुढील चार महिने ही ऑफर सुरू राहणार अशी माहिती समोर आली आहे.