Tata And Mahindra Upcoming Features : नजीकच्या भविष्यात जर तुम्हालाही नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. खरेतर भारतीय कार बाजारात आता SUV कारला मोठी मागणी आली आहे. गेल्या काही वर्षांपासून एसयूव्ही सेगमेंटच्या कारला पसंती मिळतं आहे. यामुळे ऑटो कंपन्या देखील सेडान ऐवजी आता एसयूव्ही कार बनवण्याला अधिक प्राधान्य दाखवत आहेत.
एका अधिकृत आकडेवारीनुसार 2024 च्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच जून महिन्यापर्यंत भारतातील एकूण कार विक्रीत एकट्या SUV सेगमेंटचा वाटा 52 टक्के एवढा राहिला आहे. यावरून SUV कारला भारतात किती अधिक मागणी आहे याचा अंदाज लावता येतो.
या सेगमेंटमध्ये ह्युंदाई, टाटा, मारुती सुझूकी, महिंद्रा, किया अशा टॉप ब्रँडच्या कार तुम्हाला पाहायला मिळतील. Hyundai Creta, Kia Seltos, Tata Nexon, Tata Punch आणि Maruti Suzuki Brezza या SUV गाड्या भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहेत.
या गाड्या SUV सेगमेंट मधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्या म्हणून ओळखल्या जात आहेत. दरम्यान, जर तुम्हालाही नजीकच्या काळात SUV खरेदी करायची असेल तर टाटा आणि महिंद्रा कंपनी तुमच्यासाठी दोन नवीन गाड्या लॉन्च करणार आहे. आज आपण याच दोन SUV बाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Tata Curvv : टाटा ही भारतातील एक आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. टाटा मोटर्स एक स्वदेशी ऑटो कंपनी असून ही कंपनी पुढल्या महिन्यात एक मोठा धमाका करणार आहे. ही कंपनी आपली बहुप्रतिक्षित एसयूव्ही कर्व्ह गाडी पुढल्या महिन्यात लॉन्च करणार आहे. ही गाडी ७ ऑगस्टला लॉन्च होणार अशी बातमी हाती आली आहे.
Tata Curvv चे इलेक्ट्रिक व्हेरिएंट सर्वात आधी लॉन्च केले जाईल. यानंतर कंपनी टाटा कर्वचा ICE प्रकार लॉन्च करणार आहे. एका मीडिया रिपोर्ट मध्ये टाटा कंपनी या गाडीचे इलेक्ट्रिक आणि ICE हे दोन्ही प्रकार एकाच दिवशी लॉन्च करणार असा दावा करण्यात आला आहे.
या गाडीच्या फीचर्स बाबत बोलायचं झालं तर Tata Curvv मध्ये फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, 360-डिग्री कॅमेरा, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि लेव्हल-2 ADAS तंत्रज्ञान दिले जाणार आहे. Tata Curvv EV एकदा चार्ज केल्यावर सुमारे 500 किलोमीटरची रेंज देण्यास सक्षम राहणार असा दावा कंपनीने केला आहे. या EV ची एक्स शोरूम किंमत ही 18 ते 24 लाख रुपयांच्या घरात राहणार असे बोलले जात आहे.
महिंद्रा थार रॉक्स : Mahindra ही देखील भारतातील एक आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. टाटा प्रमाणेच ही देखील एक लोकप्रिय ऑटो कंपनी आहे. ही स्वदेशी कंपनी आपल्या ग्राहकांसाठी लवकरच एक नवीन एसयुव्ही कार लॉन्च करणार आहे. महिंद्रा आपल्या एका लोकप्रिय कारचे 5 Door वर्जन लाँच करणार आहे.
थार या लोकप्रिय कारचे 5 डोअरचे वर्जन लॉन्च केले जाणार आहे. या आगामी SUV ला महिंद्रा थार रॉक्स असे नाव देण्यात आले आहे. या आगामी काळात लॉन्च होणाऱ्या थारमध्ये एलईडी डीआरएलसह नवीन डिझाइन ग्रिल, वर्तुळाकार एलईडी हेडलॅम्प्स दिले जाणार आहेत.
फीचर्स बाबत बोलायचं झालं तर या कारमध्ये 360-डिग्री कॅमेरा, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि 10.25-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले जाणार आहेत. या आगामी महिंद्रा रॉक्सची किंमत 12,30 लाख रुपयांपासून 19 लाख रुपयांपर्यंत असू शकते. मात्र गाडीची ही एक्स शोरूम किंमत राहणार आहे. अर्थातच ऑन रोड प्राईस यापेक्षा जास्त राहणार आहे.