Tata Car Discount Offer : भारतात ऑगस्ट महिन्यापासून फेस्टिव सिझन सुरू होतो. दरवर्षी ऑगस्ट महिना सुरू झाला की फेस्टिव सीजनला सुरुवात होते आणि या काळात विविध क्षेत्रात मोठी तेजी पाहायला मिळते. या काळात ऑटो सेक्टर देखील मोठ्या प्रमाणात बूस्ट होत असतो. सणासुदीच्या काळात दरवर्षी वाहनांची विक्री वाढत असते.
सणासुदीला वाहन खरेदी करणे मोठे शुभ मानले जाते आणि यामुळे अनेकजण आगामी काळात नवीन वाहन खरेदी करणार आहेत. जर तुम्हीही या फेस्टिव्ह सीझनमध्ये म्हणजेच ऑगस्ट महिन्यात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्युज आहे.
विशेषता ज्यांना टाटा कंपनीची टिगोर ही गाडी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स कडून ऑगस्ट महिन्यात टाटा टिगोर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना तब्बल 85 हजार रुपयांचा डिस्काउंट ऑफर केला जात आहे.
म्हणजे या चालू महिन्यात ग्राहकांना ही गाडी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या डिस्काउंट ऑफरमुळे ग्राहकांचे हजारो रुपये वाचणार आहेत. Tata Tigor ही कंपनीची लोकप्रिय सेडान कार आहे.
याच लोकप्रिय गाडीवर टाटा कंपनीकडून आता डिस्काउंट ऑफर केला जात आहे. मात्र हा डिस्काउंट फक्त 2023 च्या मॉडेलसाठी आहे. या डिस्काउंट ऑफर मध्ये कॅश डिस्काउंट, कॉर्पोरेट डिस्काउंट आणि एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.
म्हणजेच जर ग्राहकांना या तिन्ही ऑफर्सचा लाभ मिळाला तर ग्राहकांचे तब्बल 85 हजार रुपये वाचणार आहेत. दरम्यान आता आपण टाटा कंपनीच्या या लोकप्रिय गाडीची किंमत आणि फीचर्स अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहेत फिचर्स ?
टाटा कंपनीच्या या लोकप्रिय कार मध्ये कंपनीने अनेक भन्नाट फीचर्स अपलोड केले आहेत. या गाडीचे इंटेरियर देखील खूपच खास आहेत. कारच्या इंटीरियरमध्ये 7.0-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो आणि Apple कारप्ले कनेक्टिव्हिटी, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटो हेडलाइट्स, रेन सेन्सिंग वायपर्स आणि ऑटो एसी सारखें फीचर्स अपलोडेड आहेत.
यामुळे ग्राहकांमध्ये या गाडीची क्रेझ आहे. दिवसेंदिवस या गाडीची मागणी वाढतच आहे. याशिवाय, सुरक्षेसाठी, कारमध्ये ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमसह मागील पार्किंग सेन्सर देखील देण्यात आले आहेत.
या गाडीचे इंजिन देखील खूपच दमदार आहे. टाटा टिगोरमध्ये 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आहे. जे की, 86bhp ची कमाल पॉवर आणि 113Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कारचे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले गेले आहे.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही कार CNG व्हेरियंटमध्ये देखील उपलब्ध आहे. या व्हेरिएंट मध्ये ही कार कमाल 73.5bhp पॉवर आणि 95Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या गाडीच्या किमती बाबत बोलायचं झालं तर भारतीय बाजारात Tata Tigor ची एक्स-शोरूम किंमत 6.30 लाख ते 9.55 लाख रुपये एवढी आहे.