Tata Car Price Drop : काल हिंदुस्थानातील आघाडीची कार उत्पादक कंपनी म्हणजे टाटा मोटर्स कंपनीने आपली एक बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चीत इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. टाटा मोटर्सने आपली पहिली इलेक्ट्रिक कूप SUV Curvv काल अधिकृतरीत्या लॉन्च केली आहे. खरंतर भारतात इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा सर्वाधिक दबदबा आहे. टाटा कंपनीकडे सर्वाधिक इलेक्ट्रिक कार्स आहेत.
यामुळे टाटा कंपनीकडे सर्वाधिक इलेक्ट्रिक कार विक्री करण्याचा विक्रम देखील आहे. दरम्यान आता टाटा कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ आणखी मजबूत झाला आहे. Curvv EV या एसयूव्हीमुळे कंपनीचा इलेक्ट्रिक पोर्टफोलिओ आणखी स्ट्रॉंग झाला असून ही गाडी या सेगमेंट मध्ये चांगलाच धुमाकूळ घालणार असा विश्वास कंपनीला आहे.
या गाडीला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळणार अशी आशा कंपनीला आहे. खरे तर टाटा ही देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये आधीच अनेक गाड्या समाविष्ट आहेत. यात Nexon EV, Punch EV, Tiago EV आणि Tigor EV या लोकप्रिय गाड्यांचा समावेश होतो.
यामध्ये आता बहू प्रतिक्षित आणि बहुचर्चित Curvv EV देखील समाविष्ट झाली आहे. दरम्यान ही बहूचर्चीत गाडी ग्राहकांसाठी अधिकृतरित्या लॉन्च झाल्यानंतर Tata कडून एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता कंपनीने आपल्या जुन्या इलेक्ट्रिक मॉडेलवर मोठी डिस्काउंट ऑफर आणली आहे.
यानुसार आता ग्राहकांना काही इलेक्ट्रिक गाड्यावर 1.80 लाख रुपयांपर्यंत सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण टाटा कंपनीकडून कोणत्या इलेक्ट्रिक कारवर डिस्काउंट ऑफर दिला जात आहे याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
Tata Tiago EV : कंपनीची ही एक लोकप्रिय कार असून यावर 50 हजार रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. या ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, या इलेक्ट्रिक हॅचबॅकवर 10 हजार ते 50 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.
Tata Punch Ev : कंपनी पंच EV वर वेगवेगळ्या व्हेरियंटनुसार डिस्काउंट ऑफर करत आहे. या गाडीवर 10 हजार ते 30 हजार रुपयांपर्यंत सूट मिळतं आहे.
Tata Nexon EV : कंपनी या महिन्यात आपल्या Nexon EV वर व्हेरियंटनुसार 1.80 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. Nexon EV वर व्हेरियंटनुसार 20 हजार ते 1.80 लाख रुपयांपर्यंत सूट ऑफर केली जात आहे.