ऑटोमोबाईल

Tata CNG Car : नवीन कार खरेदी करत असाल तर जरा थांबा! लवकरच लाँच होणार ‘या’ जबरदस्त कार्स

CNG Car : टाटाच्या ग्राहकांची संख्या भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. कंपनी सतत नवनवीन कार लाँच करत असते. अशातच आता कंपनी आणखी काही CNG कार लाँच करणार आहे.

जर तुम्हाला ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला काही काळ वाट पाहावी लागणार आहे. कारण या कार काही दिवसांनंतर लाँच केल्या जाणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात हॅचबॅकच नाही तर सेडान आणि एसयूव्ही देखील लॉन्च होणार आहेत

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ऑटो एक्सपोमध्ये Tata Motors कडून Ultroz ​​आणि Tata Panch च्या CNG आवृत्त्या सादर करण्यात आल्या होत्या. या दोन्ही कारचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे त्यांचा ड्युअल सीएनजी टँक सेटअप होय.

कंपनीच्या या मॉडेल्समध्ये, एका मोठ्या CNG टाकीऐवजी, कंपनीने त्यात 2 टाक्या वापरल्या होत्या, ज्यांची क्षमता 30 लीटर इतकी होती. ते बूट क्षेत्राच्या खाली सेट करण्यात आले आहेत ज्यामुळे बूट स्पेसवर जास्त परिणाम होणार नाही.

आता Altroz ​​चे CNG व्हर्जन बाजारात आणले असून लवकरच टाटा पंच देखील सीएनजी किटसह बाजारात दाखल करणार आहे. टियागो आणि टिगोर अगोरच सीएनजीसह बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून अशातच आता Hyundai Xtor देखील CNG सेटअपसह बाजारात दाखल होणार आहे.

सणासुदीच्या काळात होईल लाँच

भारतीय बाजारपेठेत सणासुदीच्या काळात टाटा पंच लॉन्च केली जाईल. तसेच कंपनी फेसलिफ्टेड नेक्सॉन बाजारात लाँच केली जाणार आहे. कंपनी ऑगस्ट 2023 मध्ये बाजारात लॉन्च करू शकते.

तुम्हाला कंपनीच्या आगामी फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये इंटीरियरमध्ये खूप बदल पाहायला मिळणार आहेत. नवीन डिझाईन टाटा कर्ववर आधारित असेल आणि त्याला अधिक अपमार्केट इंटीरियर्स दिले जातील.

तसेच, कर्व्हच्या संकल्पना आवृत्तीचे उत्पादन सुरु आहे जे लवकरच लॉन्च करण्यात येईल. तसेच मारुती सुझुकी ग्रँड विटारा आणि टोयोटा अर्बन क्रूझर हायराईडरही बाजारात दाखल केली जाणार आहेत.

दरम्यान टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर सीएनजी तंत्रज्ञानासह येत असून भारतीय बाजारात सीएनजी मार्केटमध्ये मारुती सुझुकीचा सर्वात जास्त हिस्सा आहे. आता मारुतीला इतर ब्रँडकडूनही कठीण स्पर्धेचा सामना करावा लागेल. कारण टाटा आणि ह्युंदाई सारख्या कार उत्पादक कंपन्या या सेगमेंटमध्ये सतत कार आणत आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts