ऑटोमोबाईल

Tata Dark Edition Cars : टाटाकडून Nexon, Nexon EV, Harrier आणि Safari चे डार्क एडिशन लॉन्च ! पहा नवीन किमती …

Tata Dark Edition Cars : टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमधील पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी त्यांच्या नवनवीन कार सादर केल्या जात आहेत. अलीकडेच टाटाकडून त्यांच्या अनेक कारचे फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च करण्यात आले आहेत.

आता टाटाकडून त्यांच्या अनेक कार जबरदस्त स्टायलिश कारचे डार्क एडिशन व्हेरियंट लॉन्च करण्यात आले आहे. टाटाकडून Nexon, Nexon EV, Harrier आणि Safari चे डार्क एडिशन व्हेरियंट लॉन्च करण्यात आले आहे.

कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. तसेच या नवीन डार्क एडिशन कारच्या किमती देखील वेगळ्या असणार आहेत. कंपनीकडून कारच्या किमती देखील जाहीर करण्यात आल्या आहेत.

Nexon आणि Nexon EV ची डार्क एडिशन

टाटा मोटर्सची Nexon ही सर्वात लोकप्रिय कार आहे. कारचे अलीकडेच फेसलिफ्ट मॉडेलच लॉन्च करण्यात आले आहे. आता कंपनीकडून Nexon आणि Nexon EV चे डार्क एडिशन लॉन्च करण्यात आले आहे.

Nexon डार्क एडिशनची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 11.45 लाख रुपये असेल. कारचे इंटीरियरही ब्लॅक थीमसह सादर करण्यात आले आहे. ब्लॅक आउट अलॉय व्हील आणि डार्क एडिशन बॅजिंगसह Nexon डार्क एडिशन सादर करण्यात आली आहे.

Nexon EV डार्क एडिशनची एक्स शोरूम किंमत 19.49 लाख रुपये आहे. ऑल-ब्लॅक लेथरेट सीट्स, डार्क एडिशन बॅजिंगसह Nexon EV डार्क एडिशन सादर करण्यात आली आहे.

हॅरियर आणि सफारी डार्क एडिशन

टाटा मोटर्सकडून हॅरियर आणि सफारी एसयूव्ही कारचे डार्क एडिशन लॉन्च करण्यात आले आहे. बोल्ड ओबेरॉन ब्लॅक एक्सटीरियर, ब्लॅकस्टोन इंटीरियर थीम आणि ब्लॅक एक्सटीरियर थीम पियानो ब्लॅक ॲक्सेंटसह या दोन्ही कार सादर करण्यात आले आहे.

हॅरियर डार्क एडिशनची एक्स शोरूम किंमत 19.99 लाख रुपये आहे तर सफारी डार्क एडिशनची एक्स शोरूम किंमत 20.69 लाख रुपये आहे. तुम्ही देखील या डार्क एडिशन आता खरेदी करू शकता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts