Tata Discount Offer : तुम्हीही नवीन कार घेण्याच्या तयारीत आहात का ? मग टाटा कंपनीने तुमच्यासाठी एक अनोखी ऑफर आणली आहे. यामुळे तुमचे कार खरेदीचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार आहे. खरे तर, कार खरेदीचे अनेकांचे स्वप्न असते मात्र टाईट बजेटमुळे हे स्वप्न काही पूर्ण होत नाही. मात्र आता कार खरेदीचे स्वप्न स्वस्तात पूर्ण होणार आहे.
कारण की देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आपल्या काही निवडक कार्स वर भन्नाट डिस्काउंट ऑफर सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना कमी किमतीत कार खरेदी करता येणार आहे.
जसं की आपणास ठाऊकच आहे की नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी टाटा कंपनीने Tata Curvv Ev ही नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. दरम्यान आता कंपनीच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात काही गाड्यांवर डिस्काउंट ऑफर दिली जात आहे.
यामुळे ही टाटाच्या ग्राहकांसाठी मोठी दिलासादायी बातमी ठरणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण कंपनीच्या माध्यमातून कोणत्या गाड्यांवर डिस्काउंट ऑफर केला जात आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Tata Safari : टाटा मोटरची टाटा सफारी ही एक लोकप्रिय SUV कार आहे. या कारवर कंपनीच्या माध्यमातून तब्बल 1.49 लाख रुपयांचा डिस्काउंट ऑफर केला जात आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत 15.49 लाख रुपये एवढी आहे. मात्र कंपनीच्या या ऑफरमुळे ही गाडी स्वस्तात खरेदी करता येणार आहे.
Tata Nexon : कंपनीची ही सर्वाधिक लोकप्रिय कार आहे. दरम्यान या चालू महिन्यात म्हणजेचं ऑगस्ट महिन्यात या कंपनीच्या हॉट सेलिंग कारवर ग्राहकांना तब्बल एक लाख रुपयांचा डिस्काउंट ऑफर केला जात आहे. या गाडीची एक्स शोरूम किंमत ही 7.99 लाख रुपये एवढी आहे.
मात्र या डिस्काउंट ऑफर मुळे ही गाडी स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. तथापि ही ऑफर काही मर्यादित कालावधीसाठीचं सुरू राहणार आहे.
Tata Harrier : टाटा हरियर ही देखील कंपनीची एक लोकप्रिय एसयुव्ही कार आहे. या गाडीवर देखील कंपनीकडून जबरदस्त डिस्काउंट दिला जात आहे. या गाडीवर 1.20 लाख रुपयांचा डिस्काउंट मिळतं आहे.