Tata Electric Car Offer : नजीकच्या भविष्यातील इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर, गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. यामुळे अनेक कंपन्यांनी आता भारतीय कार मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत. इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा मोठा बोलबाला आहे. या कंपनीने इलेक्ट्रिक कारचे सर्वाधिक मॉडेल लॉन्च केले आहेत.
ही कंपनी सर्वात जास्त इलेक्ट्रिक कार विक्री करणारी कंपनी बनली आहे. खऱ्या अर्थाने टाटा कंपनी ही या सेगमेंटची बॉस आहे. विशेष म्हणजे नजीकच्या काळात कंपनीच्या माध्यमातून आणखी काही इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या जाणार आहेत.
अशातच टाटाची इलेक्ट्रिक कार खरेदी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. ती म्हणजे कंपनी आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक कार वर मोठा डिस्काउंट देत आहे. कंपनी Tata Nexon Ev, Tata Punch Ev आणि Tata Tiago Ev या तीन इलेक्ट्रिक कार वर डिस्काउंट ऑफर करत आहे.
कोणत्या इलेक्ट्रिक कारवर मिळणार डिस्काउंट?
Tata Punch EV : टाटा पंच EV ला बाजारात चांगली डिमांड आहे. शहरी आणि ग्रामीण भागातही ही कार मोठी मागणीमध्ये आहे. आता कंपनीकडून या इलेक्ट्रिक व्हेहिकलवर 10,000 ते 30,000 रूपयापर्यंत डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. या गाडीच्या किंमतीबाबत बोलायचं झालं तर ही गाडी 10.99 लाख रुपये ते 15.49 लाख रुपयाच्या एक्स शोरूम किंमतीत उपलब्ध होत आहे. ही गाडी एका चार्जवर ४२१ किमी धावते.
Tata Tiago EV : Tata Tiago EV ही देखील टाटा कंपनीची लोकप्रिय इलेक्ट्रिकल व्हेईकल आहे. या गाडीच्या लाँग रेंज व्हेरियंटवर 50,000 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट उपलब्ध करून देण्यात आला आहे. मिड-रेंज व्हेरिएंटवर 10,000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. याची किंमत ही ७.९९ लाख ते ११.८९ लाख रुपये एक्स शोरूम इतकी आहे. या गाडीची रेंज ३१५ किमी एवढी असल्याचा दावा केला जात आहे.
Tata Nexon EV : टाटा कंपनीकडून या इलेक्ट्रिक व्हेईकल वर सर्वात जास्त डिस्काउंट दिला जात आहे. या गाडीवर कंपनीच्या माध्यमातून जुलै 2024 साठी 1.3 लाख रुपयांपर्यंतचा डिस्काउंट उपलब्ध करून दिला जात आहे. Empowered + LR आणि Empowered + LR डार्क व्हेरियंटमध्ये सर्वाधिक सवलत दिली जात आहेत, तर इतर व्हेरियंट 50,000-70,000 रुपयांच्या सवलतींसह उपलब्ध आहेत.
पण या कारच्या एंट्री-लेव्हल क्रिएटिव्ह एमआर व्हेरियंटवर या महिन्यात कोणत्याही ऑफर नाहीत. या गाडीची किमत 14.49 लाख ते 19.49 लाख यादरम्यान आहे. ही या गाडीची एक्स शोरूम किंमत आहे.