ऑटोमोबाईल

टाटा कंपनीच्या ‘या’ इलेक्ट्रिक कारवर मिळतोय 50,000 चा डिस्काउंट ! किती दिवस सुरू राहणार ऑफर ?

Tata Electric Car Price Drop : अलीकडे भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला आहे. सरकारने देखील इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला विशेष प्रोत्साहन दिले आहे. यामुळे ऑटो कंपन्या देखील आता इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला विशेष प्राधान्य दाखवत आहेत. भारतात अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार लॉन्च केल्या आहेत.

टाटा मोटर्सने देखील अनेक इलेक्ट्रिक कार भारतीय कार बाजारात उतरवल्या आहेत. टाटा कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ हा इतर कंपन्यांच्या तुलनेत अधिक स्ट्रॉंग आहे. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये टाटा कंपनीने सर्वाधिक मॉडेल्स बाजारात लॉन्च केले आहेत.

टाटा टियागो इलेक्ट्रिक हे कंपनीचे सर्वात स्वस्त मॉडेल आहे. दरम्यान याच इलेक्ट्रिक व्हेईकल वर आता टाटा कंपनीकडून डिस्काउंट ऑफर दिला जात आहे.

त्यामुळे टाटा टियागो इलेक्ट्रिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे हजारो रुपये वाचणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्या माध्यमातून टाटा टियागो इलेक्ट्रिकवर 50 हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे.

हे मॉडेल बाजारात एकूण सात व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असून कंपनीकडून सर्व व्हेरिएंट वर डिस्काउंट मिळतं आहे. मात्र या सर्व व्हेरियंटवर डिस्काउंट ऑफर वेगवेगळी आहे.

यामुळे आता आपण टाटा टियागो इलेक्ट्रिक वर सुरू असणारी ही ऑफर नेमकी कशी आहे, कोणत्या व्हेरिएंट वर किती डिस्काउंट मिळणार आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

कशी आहे डिस्काउंट ऑफर?

Tata Tiago Ev IMR XE and IMR XT : कंपनीकडून या 2 वेरियंट वर दहा हजार रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. IMR XE या व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत 7.99 लाख रुपये एवढी आहे. अर्थातच डिस्काउंट मुळे ही गाडी 7.89 लाख रुपये या एक्स शोरूम किमतीत उपलब्ध होणार आहे. IMR XT ची एक्स शोरूम किंमत 8.99 लाख एवढी आहे.

Tata Tiago Ev LR XZ+ Tech Lux, LR XZ+ ACFC, LR XZ+ Tech Lux ACFC : या तिन्ही व्हेरिएंटवर कंपनीकडून 25000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. या तिन्ही वेरियंटच्या किमती अनुक्रमे 11.39 लाख, 11.39 लाख आणि 11.89 लाख अशा आहेत. या किमती एक्स शोरूम आहेत याची ग्राहकांनी नोंद घ्यायची आहे. 

Tata Tiago Ev LR XZ+ : या व्हेरिएंटवर कंपनीकडून चाळीस हजाराचा डिस्काउंट दिला जात आहे. याची किंमत 10.89 लाख एक्स शोरूम एवढी आहे.

Tata Tiago Ev LR XT : या व्हेरिएंटवर कंपनीकडून तब्बल पन्नास हजाराचा डिस्काउंट ऑफर केला जात आहे. याची किंमत 9.99 लाख रुपये ( एक्स शोरूम ) एवढी आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts