Tata Motors News : टाटा मोटर्स ही देशातील एक लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. टाटा समूहाच्या मालकीची ही उपकंपनी विविध वाहनांची निर्मिती करत असते. टाटा मोटर्स अगदी लक्झरी कार पासून ते ट्रक पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांची निर्मिती करत आहे. या कंपनीच्या पोर्टफोलिओ मध्ये कार, ट्रक, मिनी ट्रक, बस, पिकअप अशा वाहनांचा समावेश आहे.
या कंपनीच्या कार ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय आहेत. कंपनीने इलेक्ट्रिक कार देखील तयार केल्या आहेत. इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये कंपनीचे एकूण चार मॉडेल सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात कंपनी आणखी दोन मॉडेल लॉन्च करणार आहे.
इलेक्ट्रिक कार सेगमेंट मध्ये टाटा कंपनीचा मोठा बोलबाला आहे. इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ हा इतर कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्ट्रॉंग आहे. टाटा कंपनीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी दीड लाख इलेक्ट्रिक वाहन विक्री करण्याचा एक भीष्म पराक्रम आपल्या नावावर केला आहे.
अशी करणारी ही देशातील पहिलीच कंपनी आहे. दरम्यान, टाटा कंपनीने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून आता कंपनीच्या काही वाहनांच्या किमती वाढणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार , कंपनीच्या माध्यमातून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवल्या जाणार आहेत.
व्यावसायिक वाहनांच्या यादीत मिनी ट्रक, पिकअप, ट्रक, बस आणि व्हॅन यांचा समावेश आहे. व्यावसायिक वाहनांचा विचार केला असता टाटा कंपनीची देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. यामुळे निर्णयाचा देशातील व्यावसायिक वाहन खरेदी करणाऱ्यांना मोठा फटका बसणार यात शंकाच नाही.
दरम्यान आता आपण टाटा मोटर्सच्या माध्यमातून आपल्या व्यवसायिक वाहनांच्या किमती कितीने वाढवल्या जाणार आहेत आणि वाढीव किमती कधीपासून लागू राहणार आहेत या विषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
व्यवसायिक वाहनांच्या किमती किती वाढणार
टाटा मोटर्स कडून मिळालेल्या माहितीनुसार , कंपनीच्या माध्यमातून आपल्या व्यवसायिक वाहनांच्या किमती दोन टक्क्यांनी वाढवल्या जाणार आहेत. विविध मॉडेल्स आणि वाहनांच्या प्रकारानुसार किमती वाढवल्या जाणार आहेत.
तसेच नवीन किमती एक जुलै 2024 पासून लागू होणार असल्याची माहिती समोर येत आहे. अर्थातच नवीन महिन्यापासून टाटा कंपनीचे व्यावसायिक वाहन खरेदी करणे आता महाग होणार आहे. याचा साहजिकच ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे.