Tata Punch Electric : देशात मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक कारची मागणी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांची हीच मागणी पाहता इलेक्ट्रिक कंपन्या एकापेक्षा एक सरस इलेक्ट्रिक वाहने बाजारात लाँच करू लागल्या आहेत.
अशातच आता टाटा आपली नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. जी सिंगल चार्जवर 300 किमी रेंज देईल, असा दावा कंपनीनं केला आहे. ज्यात तुम्हाला दमदार फीचर पाहायला मिळतील. लवकरच कार बाजारात धुमाकूळ घालताना दिसेल. जाणून घेऊयात किंमत.
असे असेल नवीन टाटा पंच ईव्हीचे डिझाइन
मीडिया रिपोर्ट्सनुसार टाटाची नवीन पंच इलेक्ट्रिक ऑक्टोबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. खरंतर टाटा मोटर्स अनेक दिवसांपासून पंच इलेक्ट्रिकची चाचणी करत असून कारचे मॉडेल अनेक वेगवेगळ्या प्रसंगी चाचणी दरम्यान दिसून आले आहे. जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
यामध्ये फ्रंटमध्ये चार्जिंग सॉकेट कंपनीकडून दिले जाणार आहे. हे लक्षात घ्या की कंपनीची ही पहिली इलेक्ट्रिक कार असणार आहे, यामध्ये तुम्हाला फोर-व्हील डिस्क ब्रेक, नवीन अलॉय डिझाइन आणि नवीन अपडेटेड केबिन पाहायला मिळेल. त्याशिवाय यात 10.25 इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्याची शक्यता आहे. ही कार एकाच चार्जिंगमध्ये तब्बल 300KM ची रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.
जाणून घ्या किंमत
किमतीचा विचार केला तर कंपनीच्या आगामी इलेक्ट्रिक कारची किंमत सुमारे 10 लाख रुपयांपासून सुरू होऊ शकते.
स्पर्धा
नवीन टाटा पंच EV मार्केटमध्ये असणाऱ्या Citroën EC3 ला कडवी टक्कर देऊ शकेल. यात टाटाची Ziptron पॉवरट्रेन असणार आहे, जी Tigor.ev मध्ये देखील पाहायला मिळते. कर्व्ह संकल्पनेत दिसल्याप्रमाणे या कारच्या केबिनला नवीन दोन-स्पोक स्टीयरिंग व्हील मिळेल. यामध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले सपोर्टसह नवीन 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट स्क्रीन पाहायला मिळेल. कंपनीच्या आगामी कारमध्ये लिक्विड-कूल्ड बॅटरी पॅक असू शकतो.