Tata Punch iCNG : टाटा मोटर्सकडून त्यांच्या ग्राहकांसाठी दिवसेंदिवस अनेक नवीन कार सादर केल्या जात आहेत. तसेच टाटाच्या नवनवीन कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद आत आहे. एसयूव्ही कारच्या मागणीमध्ये वाढ झाल्याने टाटा मोटर्सकडून एसयूव्ही कार उत्पादनाकडे जास्त लक्ष दिले जात आहे.
टाटा मोटर्सकडून गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांच्या पंच कार पेट्रोल व्हर्जनमध्ये सादर केली आहे. तसेच ही टाटा मोटर्सची सर्वात लहान एसयूव्ही कार आहे. ग्राहकांचा या कारला प्रतिसाद पाहता आणि वाढत्या सीएनजी कारची मागणी पाहता कंपनीकडून या कारचे सीएनजी मॉडेल काही दिवसांपूर्वी लॉन्च केले आहे.
टाटा मोटर्सकडून लॉन्च करण्यात आलेल्या पंच सीएनजी कारला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. जबरदस्त मायलेज आणि किंमत कमी असल्याने ग्राहक या सीएनजी कारकडे आकर्षित होत आहेत.
टाटा पंच सीएनजीमध्ये टोर्नेडो ब्लू कलर देण्यात आला आहे
टाटा मोटर्सकडून गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची पंच कार सीएनजी व्हर्जनमध्ये सादर केली आहे. या कारमध्ये टोर्नेडो ब्लू रंग देण्यात आला आहे. या कारची एक्स शोरूम किंमत 7.10 लाख रुपयांपासून सुरु होते. तसेच ही कार २६.४९ किमी/किलो मायलेज देत असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद या कारला मिळत आहे.
टाटा पंच सीएनजीमध्ये इंजिन
टाटा मोटर्सकडून त्यांच्या ५ सीटर एसयूव्ही कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. 103 Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. तसेच ग्राहकांना ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह ऑफर करण्यात आली आहे. कारमध्ये अलॉय व्हील्स, फॉग लाइट्स – फ्रंट, पॉवर विंडोज रिअर, पॉवर विंडोज फ्रंट असे फीचर्स देण्यात आले आहेत.
टाटा पंच सीएनजी बूट स्पेस
टाटा पंच सीएनजी कारमध्ये 210 लीटरची बूट स्पेस देण्यात येत आहे. तसेच सीएनजीसाठी कारमध्ये दोन सिलिंडर देण्यात येत आहेत. कारमध्ये मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, 7.0-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम ग्राहकांना ऑफर करण्यात येत आहे. कारचा गिअरबॉक्स 5-स्पीड ट्रान्समिशनसह देण्यात आला आहे.
टाटा पंच सीएनजीची उंची आणि रुंदी
टाटा मोटर्सकडून सादर करण्यात आलेल्या पंच सीएनजी कारची उंची 1,615 मिमी आहे तर रुंदी 1,742 मिमी आहे. कार स्टार्ट करण्यासाठी इंजिन स्टार्ट स्टॉप बटण देण्यात आले आहे. पॉवर अॅडजस्टेबल एक्सटीरियर रिअर व्ह्यू मिरर, टच स्क्रीन, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल अशी वैशिष्ट्ये देखील देण्यात आली आहेत.